आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून योजनांच्या कामातून विकास साधावा; जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांचे मत

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी योजनांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन काम करा आणि त्यांना लाभ द्या, असे मत जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आयोजित वार्षिक क्रेडिट प्लॅन सेमिनारच्या कार्यशाळा प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मिलिंद गावसाने, उपविभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया पुणे विभाग, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी प्रशांत नाशिककर, विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, माविम मराठवाडा सिद्धाराम माशाळे, जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे, धनंजय कारंडे, योगेश पाटील, युवराज केदार वेणुगोपाल मरपल्ली, देशपांडे , राहुल वालीकर, मधुरा अध्यापक उपस्थित होते.

माविमची कार्यपद्धती ,व्हिजन, आजवरचे साध्य लोक संचालित साधन केंद्राची आर्थिक शाश्वतता व नाव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रम तसेच त्यातील मुख्य घटक पुढील दिशा याबद्दल महिती दिली. सोमनाथ लामगुंडे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी सन २०२१-२२ मध्ये विविध बँकांकडून महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना व वैयक्तिक महिलांना बँकांकडून करण्यात आलेल्या लघु वित्त पतपुरवठ्याबाबत व सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील बँकनिहाय लक्ष याबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या हस्ते बचत गटांना जास्त कर्ज वाटप केलेल्या लोक संचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक यांचा सत्कार करून माविमच्या कार्याचे कौतुक व अभिनंदन केले व बेटी बचाव व बेटी पढाव, रुक्मिणी सप्ताह दरम्यान केलेल्या कामाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन मा. सतीश भारती सहा.जिल्हा समन्वय अधिकारी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी पार पडण्याबाबत माविम जिल्हा कार्यालयाचे दिपाली अध्यापक व संतोष पाटील यांनी परिश्रम घेतले.

ग्रामीण भागातील घटकांना आर्थिक मदत
कोणतेही काम करताना आपण एक सेवक आहोत या नात्याने मर्यादित काम न करता किंवा फक्त दिलेले लक्ष पूर्ण करण्यापर्यंत काम करण्याऐवजी त्यापेक्षा जास्त काम करावे.सर्व बँकांनी जास्तीत जास्त गटांना कर्जपुरवठा करून अनेक गरीब कुटुंबांना रोजगार निर्मितीची संधी आर्थिक स्वरूपाच्या मदतीने होईल याची काळजी घ्यावी असे आव्हान केले आहे. ग्रामीण भागातील घटकांना आर्थिक मदत केल्यानंतर त्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होते असे जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...