आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागण्या आणि तक्रारी:भाजपच्या संवाद बैठकीत कार्यकर्त्यांचा तक्रारींचा पाढा

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहेब मी भाजपचा कार्यकर्ता आहे, विरोधी पक्षात असताना आंदोलन केल्याने गुन्हे दाखल झाले. ते अद्याप मागे घेतले नाहीत. पोलिस त्रास देत आहेत. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर असून, पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, एमआयडीसीत अग्निशमन केंद्र उभारा, पालिकेत प्रशासक असल्याने माजी नगरसेवकांचे काम होत नाही. त्यासाठी पालिका प्रशासकांना सोबत बैठक घेऊन सूचना द्या, नगरसेवकांना ५० लाख रुपये निधी द्या. पालिकेचे सात प्रसूतिगृह दुरुस्त करा आदी मागण्या भाजपचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केल्या.

भाजपा कार्यकर्ता संवाद अंतर्गत हाॅटेल हेरिटेज येथे शनिवारी रात्री बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री विखे-पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान अनेक मागण्या पुढे आल्या. एमआयडीसीत अग्निशमन केंद्र उभे करा, अंतर्गत रस्ते करा, असे दीनानाथ धुळम म्हणाले. स्मार्ट सिटी कामांची चौकशी करा, शहरात रोज पाणीपुरवठ्यासाठी भाजपाने वचननामा दिला. त्यामुळे समांतर जलवाहिनीचे काम सुरू करा. भाजपच्या २१ नगरसेवकांना निधी नाही. प्रत्येकी ५० लाख निधी द्या, असे सुरेश पाटील म्हणाले. पालिकेत प्रशासक असल्याने माजी नगरसेवकांची कामे होत नाहीत. त्यासाठी पालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित करावी, असे नागेश वल्याळ म्हणाले. पोलिस कार्यकर्त्यांना घरातून नेऊन त्रास देत आहेत असे संजय कोळी म्हणाले. पालिकेच्या सात प्रसूतिगृहांसाठी प्रत्येकी दोन कोटी निधी द्यावा, अशी मागणी राजकुमार पाटील यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...