आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तजना...निर्गुण:बेगम पेठेतील विठ्ठल मंदिरात गजानन विजयग्रंथाचे पारायण

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय जय सद्गुरू गजानन रक्षक तूची भक्तजना...निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात या शब्दांत नमन करत श्रीगजानन विजय ग्रंथाचे पारायण झाले. निमित्त होते श्री स्वकुळसाळी विणकर समाजाच्या विठ्ठल मंदिरात आयोजित गुरुपुष्यामृत.

बेगम पेठेतील विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम झाला. त्यावेळी सकाळी मंदिरातील विठ्ठलाची काकडा आरती झाल्यानंतर सात वाजल्यापासून महिलांनी सामूहिकरीत्या पारायणाला सुरुवात केली. दिवसभर पारायणाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम सादर करून या पारायणाचा समारोप केला. यावेळी निरूपण करत पोथीचे पारायण जयहरी साखरे यांनी केले. यावेळी त्यांनी धार्मिक कार्याला श्रद्धेची जोड हवी आणि त्याला कृतीची साथ हवी अशी भावना निरुपणातून व्यक्त केली.

या प्रसंगी समाजातील मान्यवरांची उपस्थित होती. महाआरतीनंतर झुणका-भाकरचा प्रसाद भाविकांना देण्यात आला. त्यासाठी नंदकिशोर सपार, शिवाजी सरवदे, रघुराज उपरे, गोविंदराज एकबोटे, आनंद गुळेद यांनी सहकार्य केले. या प्रसंगी भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमितत सप्ताहाच्या आयोजनाची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...