आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:समाजमाध्यमातून ओळख ; घरी येऊन दमदाटी, विनयभंग

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणाशी समाज माध्यमात एका महिलेची ओळख झाली. त्यातून तरुणाने महिलेच्या घरी आला आणि महिला व पतीला शिवीगाळ दमदाटी केली. लक्ष्मण सलगर (रा. लातूर - पूर्ण नाव व पत्ता नाही) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित महिला एमआयडीसी पोलिसात मंगळवारी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ ऑगस्ट रोजी घडला होता. त्या महिलेची समाज माध्यमात लक्ष्मण सलगर याच्याशी ओळख झाली. तरुण महिलेच्या घरी गेला, आपण बाहेर फिरायला जाऊ म्हणाला. महिला प्रतिसाद न दिल्यामुळे तो शिवीगाळ, दमदाटी करू लागला. दरम्यान पती मदतीला आला. यानंतर दोघांनाही शिवीगाळ, दमदाटी करत विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...