आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघड प्रश्न:दोन दिवसांआड पाणी देण्याचा फेरविचार सदोष वितरण; 40% गळतीचे आव्हान

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोणाकाळी दिवसातून दोनदा सकाळ-संध्याकाळ पाणीपुरवठा होणाऱ्या सोलापूर शहाराला सध्या चार किंवा पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. तो दोन दिवसांआड करण्याचा मनोदय नव्या आयुक्तांनी व्यक्त केला आहे. शहराच्या गरजेएवढे पाणी तीन स्रोतांत उपलब्ध आहे. सदोष वितरण आणि ४० टक्के गळती रोखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

नव्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आधी चार आयुक्तांनी असे प्रयत्न करून पाहिले. अगदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वाटर ऑडिट केले. वितरणातील दोष दाखवले. पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही. नव्या आयुक्तांनी नव्या वर्षात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले. त्यादिशेने प्रयत्न सुरू असून सध्याच्या वितरणप्रणालीचा आढावा घेऊन फेरनियोजन करत असल्याचेही सांगितले.

शहराच्या पाणीपुरवठयावरून महापालिकेच्या यापूर्वीच्या आयुक्तांनी हतबलता व्यक्त केली होती. शासनाचे वरिष्ठ अधिकारी राधेशाम मोप्पलवार यांनी ‘तुमच्या केसाचा गुंता शेजाऱ्यांनी सोडवायचा’ असे म्हणत पाणीपुरवठ्याच्या समस्येविषयी महापालिकेवर रोष व्यक्त केला होता. महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना महापालिका पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले. शहरातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. रोज पाणी देण्याचे आश्वासन देत भाजपने इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेवर सत्ता मिळवली. मात्र, त्यांनाही रोज काय दोन दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही.

समांतर जलवाहिनीचा प्रश्न ऐरणीवर आहे. जुळे सोलापुरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी स्काडा प्रणाली सुरू करत आहेत. त्यासाठी बुधवारी काम हाती घेण्यात आले आहे. नव्या आयुक्तांनी शहरातील विविध प्रकल्पांवर कालबध्द पध्दतीने काम करण्याचे नियोजन त्यांनी केले. नव्या वर्षात दोन दिवसांआड करण्याचा प्रयत्न करू, असे त्या मंगळवारी पत्रकारांना संवाद साधताना म्हणाल्या.

‘स्काडा’वर बुधवार काम पाणीपुरवठा १ दिवस पुढे चार दिवसांआड पाणीपुरवठा होेत आहे. संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी बुधवारी जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीजवळ मीटर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी ३० तास पाणीपुरवठा बंद करून काम करावे लागणार आहे. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. एक दिवस पाणीपुरवठा पुढे जाईल, असे प्रसिध्दीपत्रक महापालिकेच्या वतीने देण्यात आले.

समांतर जलवाहिनीसाठी ३६० कोटींचा प्रस्ताव उजनी धरण ते सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीकडे २५० कोटी, एनटीपीसीकडे २५० कोटी तरतूद आहे. कमी पडणारी ३६० कोटी शासनाकडे मागण्यात येत आहे. ते देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. त्यानुसार महापालिकेने ३६० कोटींचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे.

पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी आवश्यक ते काम करण्यात येत आहे. पाण्याच्या कामासाठी टप्पाटप्याने निधी तरतूद करून त्यानुसार कामे करण्यात येणार आहेत. पाण्याच्या प्रश्नास प्राधान्य असणार आहे.’’ शीतल तेली- उगले, महापालिका आयुक्त

बातम्या आणखी आहेत...