आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Reduction In Milk Purchase Price By One Rupee Per Liter, Financial Crisis Of Producers; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​| Marathi News

खासगी उद्योगाचा निर्णय:दूध खरेदी दरात लिटरमागे एक रुपया केली कपात, उत्पादकांची आर्थिक कोंडी; ​​​​​​​ सावरणाऱ्या उत्पादकांना पुन्हा खाईत टाकण्याचा प्रयत्न

उत्तर सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील खासगी उद्योगाने दुधाचा दर प्रतिलिटर एक रुपयाने कमी केला आहे. दूध व्यवसायाची परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच त्याच्या नरडीला नख लावण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा दूध उत्पादकांतून केला जात आहे. दूध दर कपातीमागे जागतिक बाजारपेठेतील दूध भुकटीच्या दराचे कारण पुढे केले जात आहे. मात्र या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या कारणात तथ्य नसून, राज्यातील काही संघटित दूध उद्योगांच्या नफेखोरीमुळे दर कपात झाली आहे.

तीन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जानेवारी महिन्यापासून दूध व्यवसाय स्थिरावत चालला होता. कोरोनाच्या काळात दूध व्यावसायिकांची मोठी पिळवणूक करण्यात आली. राज्य शासनाकडून दुधाचा किमान हमीभावही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला गेला नाही. त्यावेळी शासनाने दूध भुकटीला वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देऊन दूध व्यवसायाला मदत करण्याचा प्रयत्न झाला. एक वर्षानंतर अनुदान मिळत नसल्याचे कारण देत खासगी संस्थांनी या योजनेतून माघार घेतली. अक्षरश: प्रतिलिटर १७ रुपयांपर्यंत खाली आणून दूध उत्पादकांची मोठी पिळवणूक केली. अशा विपरीत परिस्थितीतही शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. कोरोना महामारी संपल्यानंतर अर्थकारण स्थिरावत असताना दुधाची मागणी वाढली.

दूध दरात सुधारणा होत गेली. गेले वर्षभर दुधाचे दर प्रतिलिटर २५ ते २६ रुपयांपर्यंत होते. चालू वर्षात जानेवारीपासून दुधाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्यापर्यंत दुधाचे दर ३७ रुपये प्रतिलिटरपर्यंत आले. या दरवाढीमुळे उत्पादकांच्या हाती खर्च वजा जाता चार पैसे राहत होते. मात्र फक्त नफ्याला सोकावलेल्या खाजगी दूध उद्योगांनी शेतकऱ्यांची कोंडी करण्याचे धोरण पुन्हा अवलंबले आहे. एक नोव्हेंबर २०२२ महिन्यापासून दूध दरात एक रुपयांची कपात करण्याचे धोरण हे त्याचेच फलित आहे.

संघटित दडपशाही, शासनाने लक्ष द्यावे
दूध व्यवसायात काही लोकांची मक्तेदारी तयार झाली आहे. त्यांच्या गलिच्छ प्रवृत्तीमुळे दूध उत्पादकांची लूट होत आहे. जागतिक बाजारपेठेत दूध भुकटीचे दर चढे असताना दर कमी करणे अनाकलनीय आहे. सध्या दुधाची मागणी वाढली असताना दर सुधारणे अपेक्षित होते. या प्रश्नाबाबत सरकारने त्वरित कठोर पावले उचलण्याची गरज असून, ही संघटित दडपशाही मोडणे गरजेचे आहे. -राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

दुधाच्या दरावर परिणाम होणार नाही
दूध भुकटीचे दर कमी झाल्यामुळे दुधाचे प्रति लिटर एक रुपयांनी भाव कमी करण्यात आले आहेत. मात्र दुधाच्या दरात फार घसरण होणार नाही एक दोन महिन्यांनंतर परत दुधाच्या दरात सुधारणा होईल. -दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध, इंदापूर

बातम्या आणखी आहेत...