आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:लग्नास नकार, गर्भवतीची आत्महत्या; महिन्याने गुन्हा

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जॉबसाठी पुण्यात गेलेल्या तरुणीचे एका तरुणाशी प्रेम जुळले. नंतर ती पाच महिन्यांची गर्भवती झाली. प्रियकराने लग्नास नकार दिला. त्यामुळे निराश होऊन तरुणीने येथील संभाजी तलावात आत्महत्या केली. याबाबत प्रियकर स्वप्निल बंडे याच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मृत तरुणीचे नाव आरती प्रकाश भंडारी आहे.

वनिता प्रकाश भंडारी, वय ४७, रा. विडी घरकुल यांची मुलगी आरती हिचे पुण्यात स्वप्निल बंडे, रा. पुणे याच्याशी प्रेम जुळले होते. २९ ते ३० ऑक्टोबर दरम्यान तिने आत्महत्या केली, अशी फिर्याद आरतीची आई वनिता भंडारी यांनी दाखल केली. यावरून स्वप्नील बंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...