आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:परदेशी प्राणी, पक्ष्यांची नोंदणी करणे आता बंधनकारक, तस्करीचे प्रकार थांबवण्यासाठी केंद्राचा पुढाकार

सोलापूर / विनोद कामतकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतामधून इतर देशांमध्ये चोरट्या पद्धतीने वन्यप्राण्यांच्या तस्करीचे प्रकार

हौसेखातर घरामध्ये सांभाळलेले आफ्रिकने ग्रे पोपट, मकाऊ पोपट, समुद्री कासव व इतर विदेशी प्राण्यांची नोंद शासनाकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मागील काही वर्षांमध्ये वन्यजीवांच्या तस्करीचे वाढते प्रकार, चोरट्या मार्गाने देशात आणण्यात येणारे दुर्मिळ वन्यप्राणी, पक्ष्यांची सविस्तर माहिती कळावी, यासाठी केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत ते प्राणी-पक्षी सांभाळणारे व विक्रेत्यांनी स्वत:हून नोंदणी बंधनकारक आहे. भारतामधून इतर देशांमध्ये चोरट्या पद्धतीने वन्यप्राण्यांच्या तस्करीचे प्रकार घडतात.

त्याचपद्धतीने इतर देशांमधून आपल्याकडे दुर्मिळ प्राणी, पक्षी आणले जातात. काहीच्या विक्रीस कायदेशीर मान्यता नाहीत. पण, चोरट्या पद्धतीने आपल्याकडे ते आणले जातात. त्या प्रकारचे प्राणी-पक्ष्यांची नोंदणी संबंधितांनी स्वतहून छायाचित्रांसह वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे त्यासंदर्भात माहिती जमा करणे आवश्यक आहे. तसेच, त्या प्राणी-पक्ष्यांना पिल्लं झाल्यास त्यांच्याही नियमित नोंदी वनविभाकडे करून ‘ना हरकरत प्रमाणपत्र’ (एनआेसी) घ्यावी.

दुर्मिळ प्राणी, पक्षी पाळणे गुन्हा

घरात आणलेला प्राणी, पक्षी दुर्मिळ असून त्यास पाळणे गुन्हा असल्याचे अनेकांना माहितीही नसते. त्यासंदर्भात लोकांनी स्वत:हून त्याबाबत माहिती देण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी शासनाने मुदत दिली आहे. चोरटी विक्री, तस्करीचे प्रकार थांबवण्यासाठी शासनाने परिपत्रक काढले आहे. सुनील लिमये, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग.

केंद्र शासनाने नोंदणीसाठी सहा महिन्यांची (नोव्हेंबर पर्यंत) मुदत दिली आहे. त्या प्राणी-पक्ष्यांची मालकी जाहीर करण्यासाठी कोणतीही कागदपत्रांची आवश्यकता नसून ती सवलत शासनाने दिलली आहे. पण, त्यानंतर माहिती जाहीर करणाऱ्यांना मात्र, सविस्तर कागदपत्रांची आवश्यकता आहे. सोलापुरात हौशी पालकांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये ती संख्या अधिक असेल. -डॉॅ. प्रतीक तलवाड, वन्यजीव अभ्यासक, बार्शी

कारण काय? : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने विदेशी प्राण्यांची आयात प्रक्रिया सोयीस्कर करण्यासाठी त्या संदर्भातील अध्यादेश काढला आहे. वन्यजीव संवर्धनासाठी जागतिक पातळीवर अतिसंकटग्रस्त प्राणी-पक्ष्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामधील अतिसंरक्षित, संरक्षित परिशिष्टामधील प्राणी, पक्ष्यांच्या तस्करीचे प्रकार थांबवण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे. तसेच, सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. भविष्यात क्वचितप्रसंगी प्राणी-पक्ष्यांमार्फत एखादा विषाणू पसरला त्यासंदर्भातील अद्ययावत माहिती असावी, अशी शक्यता काही प्राणीमित्रांनी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन नोंदणी करावी

विक्रेते, संगोपन करण्याऱ्यांनी स्वत:हून केंद्रीय मंत्रालयाच्या ‘परिवेश पोर्टल’ ऑनलाइन नोंदणी करावी. तसेच, वन्यजीव विभागास त्याबाबतही माहिती कळवून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे. समुद्री कासव, आफ्रिकन पोपट, स्कालमेंट मकाव, बॉल पायथन, विविध प्रकारचे लव्ह बर्ड, करड्या रंगाचे आफ्रिकन पोपट यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.