आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका अतिक्रमण:पावणेपाच हजार फेरीवाल्यांची नोंदणी; 30 ऑगस्टपर्यंत मुदत

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात हातगाडीवाले, फेरीवाले यांना नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका यूसीडी विभागाच्या वतीने नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणी नसलेल्या फेरीवाल्याच्या विरोधात पालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई होऊ शकते. आतापर्यंत शहरात ४७५२ जणांनी अर्ज भरले असून, सुमारे १३ हजार जणांनी अर्ज भरणे अपेक्षित आहे.

दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत शहरातील फेरीवाल्यांना मदत करण्याकरता सर्व्हे करण्यात येत आहे. पथक फिरत असून, त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र दिल्यानंतर आॅनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. याशिवाय पालिका यूसीडी विभागात मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. रहिवास दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...