आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली:शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी नियमित योग करणे फायद्याचे; माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांचे आवाहन

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त रॅली शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमित योगा करावा, योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जाऊन त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी रविवारी केले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, दि आर्ट ऑफ लिव्हिंग, विवेकानंद केंद्र, भारतीय योग संस्था, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, गीता परिवार सर्व कल्याण योग, रुद्र अकादमाी ऑफ मार्शल आर्ट अॅण्ड योग यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्‍त जनजागरण रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. स्वामी बोलत होते.

यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा युवा समन्वयक अधिकारी अजितकुमार, योग समन्वयक मनमोहन भुतडा, पतंजली योग पीठाच्या सुधा अळ्ळीमोरे, माजी नगरसेविका संगीता जाधव, सुभाष उपासे, राजू जुंजा, सुहास देशपांडे, दत्तात्रय चिवडशेट्टी, सुनील आळंद, रमेश सोनी, नंदकुमार चितापुरे, लक्ष्मण भंडारी, जितेंद्र महामुनी, रघुनंदन भुतडा आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. के.एल.ई. हायस्कूलच्या मैदानावर सकाळी सातपासून लोकांनी रॅलीसाठी गर्दी केली होती. ‘करा योग राहा निरोग’ मानवतेच्या कल्याणासाठी योग आदी घोषणासह रविवारी जुळे सोलापूर परिसर दुमदुमला होता. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाचशे लोकांची जनजागरण रॅली के.एल.ई. हायस्कूल मैदान, दावत चौक, भारतीय विद्यापीठ, शिवदारे कॉलेज आणि म्हाडा कॉलनीमार्गे डी मार्टपासून के.एल.ई. हायस्कूल मैदानावर विर्सजित करण्यात आली. यावेळी सर्व योग संस्थांचे प्रतिनिधी यांनी योगविषयक संदेश देणारे फलक, झेंडे आपल्या हातामध्ये घेतले होते.

योग शिबिराचे आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी साजरा करण्याकरिता सकाळी सात ते आठ या वेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मानवतेसाठी योग विषयावर योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सर्व वयोगटासाठी खुले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी यावेळी केली.

बातम्या आणखी आहेत...