आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:‘संभव’कडून बेघर महिलेचे पुनर्वसन, रायगड येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक चौक , वालचंद कॉलेज आदी परिसरात फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलेस संभव फाउंडेशनच्या आतिश कविता लक्ष्मण यांच्या मदतीने रायगड येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी कार्याचे महत्त्व समजून घेत खास वाहन उपलब्ध करून दिले.

अशोक चौक परिसरात या महिलेचा अतिशय दीन अवस्थेत वावर होता. मनोरुग्ण असल्याने या दयनीयतेत भरच पडलेली. अंगावरील कपड्यांचेही भान नसल्याने तिचे पुनर्वसन करण्याची निकड होती. संभव फाउंडेशनने तातडीने हालचाली केल्या व रायगड पुनर्वसन केंद्राशी संपर्क साधला. तेथील परवानगी घेऊन सोलापुरात कार्यकर्त्यांच्या मदतीने मदत कार्य सुरू केले. या धडपडीला समजून घेऊन पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनीही वाहनाची मदत दिली. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून आतिशने या मनोयात्रीचे पुनर्वसन केले.

मनात खूप इच्छा असतानादेखील मदतीचे हात कमी पडत आहेत. हक्काची जागा नसल्याने जेथे मनोरुग्ण आहेत तेथेच सेवा करावी लागते. शक्य त्या पद्धतीने सोय करण्यात येते. जास्तीत जास्त गरजू, बेघर, दिव्यांग, मनोयात्र्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करू. अधिक माहितीसाठी ९७६५०६५०९८ यावर संपर्क साधता येईल. आतिश कविता लक्ष्मण शिरसट

बातम्या आणखी आहेत...