आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:फ्रॅक्चर्ड फ्रीडमचा पुरस्कार नाकारणे हे राज्य सरकारचे प्रतिगामी कृत्यच

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोबाड गांधी यांच्या “फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाचा अनघा लेले यांनी अनुवाद केला. त्याला राज्य शासनाने पुरस्कार जाहीर करून निर्णय मागे घेतला. ही लाजीरवाणी गोष्ट आहे, शिवाय सरकारचे प्रतिगामी कृत्य असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे. पुरस्कार तातडीने पुन्हा जाहीर करून प्रदान करण्यात यावा, अशी मागणीही ठेवली आहे.

या पुस्तकावर कायद्याने बंदी नाही. याचे कारण पुस्तकात काहीही आक्षेपार्ह आशय नाही. उलट शासनानेच नेमलेल्या तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार शासनानेच हा पुरस्कार जाहीर केला. माओवादी, नक्षलवादी यांच्या मार्गाविषयी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. पक्षाने त्याला विरोधच केला. या आत्मघातकी हिंसक कारवायांमुळे आमचे शेकडो कार्यकर्ते प्राणांना मुकले, असेही नारकर म्हणाले.

इडी सरकारचा अडाणीपणाच
महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत शरद बावीस्कर आणि आनंद करंदीकर यांनी बाणेदारपणे आपले पुरस्कार परत केले. प्रज्ञा पवार आणि नीरजा या कवयित्री, लेखिकांनी निर्भयपणे साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

तज्ञ समितीतील सदस्यांनीही केवळ शाब्दिक निषेध न करता तो कृतीत उतरवून वाङ्मयीन मूल्यांच्या रक्षणार्थ उभे राहिले पाहिजे. जनतेने शिंदे-फडणवीस सरकारच्या अशा अडाणी मनमानीला ताठ मानेने विरोध करावा.''- डॉ. उदय नारकर, राज्य सचिव माकप

बातम्या आणखी आहेत...