आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामदैवत शिवयोगी सिध्देश्वर मंदिरासमोरील दोन्ही रस्त्यांना गटारीच्या घाण पाण्याचा आणि अतिक्रमणाचा विळखा पडला असून दोन दिवसात अतिक्रमण काढून पादचारी मार्गासह वाहतुकीला रस्ता मोकळा करावे अन्यथा पालिकेच्या प्रवेशद्वारात निद्रा आंदोलन करून प्रशासनाला बांगड्यांचा आहेर देऊ, असा इशारा सकल लिंगायत महासमितीचे राज्य समन्वयक डाॅ. बसवराज बगले यांनी दिला. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त शीतल तेली-उगले आणि पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांना निवेदन दिले.
ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरासमोर गेल्या दोन महिन्यांपासून गटारीचे घाण पाणी, लाकडी व लोखंडी फर्निचरांचे अतिक्रमण यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. पादचारी मार्ग हरवले असून मुख्य रस्ता गायब झाला आहे. चेंबर तुंबले असून रस्त्यावरील ड्रेनेजचे पाणी वाहात आहे.बेकायदेशीर अतिक्रमणामुळे या परिसरात एकेरी वाहतूक होत आहे. मंदिरासमोरचे अतिक्रमण हटवून परिसर दोन दिवसात स्वच्छ करा, असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यात्रा नियोजन बैठक रद्द, महापालिकेच्या बैठकीनंतर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त मंगळवारी आयोजित बैठक जिल्हाधिकारी रद्द केली. महापालिकेने पहिल्यांदा नियोजन करावे त्याचा आराखडा जिल्हा प्रशासनासमोर सादर करावा असे निर्देश देत हे बैठक रद्द करत असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले.
‘मंदिर परिसरातील ट्रॅक सुरू ठेवा’ सिद्धेश्वर मंदिर परिसरातील सर्व गेट बंद असल्याने भक्तांना येण्यासाठी अडचण येत आहे. वाॅकींग ट्रॅक बंद केल्याने भक्तांना जाता येत नाही. तो रस्ता सुरु ठेवावे तसेच पुर्वेकडील गेट सुरु करावे अशी मागणी भक्तांनी केले. संगित कारंजे सुरु हाेताच बंद करण्यात येणारा रस्ता सुरु ठेवावे अशी मागणी सायंकाळी त्या परिसरात येणाऱ्या नागरिकांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.