आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणीपत्र:होम मैदानावरील साहित्य काढा; सिद्धेश्वर देवस्थानचे मागणीपत्र

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारीत सिद्धेश्वर यात्रा भरणार आहे. त्यासाठी सिद्धेश्वर देवस्थानने सालाबादप्रमाणे महापालिकेकडे होम मैदानाचा ताबा मागितला आहे. तसेच होम मैदानावरील पडलेले साहित्य उचलून सफाई करण्यास सांगितले. समितीच्या सदस्यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. मैदानावर लोखंडी पाइप, जाळलेले पाइप आहेत.

ते पाइप हटवावेत. गवत आणि काटेरी झुडुपं उगवली आहेत ती काढावीत. स्वच्छता करून मैदान देवस्थानच्या ताब्यात द्यावे, अशा मागणीचे पत्र आयुक्तांना देण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे बाळासाहेब भोगडे, यात्रा समितीचे चेअरमन भीमाशंकर पटणे, कोनापुरे आदी उपस्थित होते. यात्राकाळात १ डिसेंबर ते ३१ जानेवारीपर्यंत मैदान समितीच्या ताब्यात असते.

पाइप हलवणार
होम मैदान येथे ठेवण्यात आलेले डक्ट पाइप इतर ठिकाणी हलवण्यात येणार आहेत. यासाठी नियोजन करण्यात आले आहे.’’ -संदीप कारंजे, नगर अभियंता

बातम्या आणखी आहेत...