आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पर्यायी जागा न देता घर काढले; पालिकेसमोर चूल मांडून स्वयंपाक

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मड्डी वस्ती येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एकाचे घर महापालिकेने पर्यायी जागा न देताच अतिक्रमण आहे म्हणून आठ दिवसांपूर्वी हटवले. आपल्यावर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी त्या कुटुंबाने महापालिकेसमोर चूल मांडून स्वयंपाक करत आपला आक्रोश मांडला. दरम्यान, त्या परिवारास आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत करत पालिका आयु्क्त पी. शिवशंकर यांची भेट घालून देत निवेदन दिले. जुने पुरावे दिल्यास त्यांना पर्यायी जागा देऊ, असे आयुक्तांनी त्यांना सांगितले.

मड्डी वस्ती परिसरातील खुल्या जागेत वडिलोपार्जित काळापासून श्रावण यल्लप्पा चौगुले यांचे कुटुंब झोपडी घालून राहत आहे. रस्त्याला लागणारी खडी फोडून चौगुले कुटुंब उदरनिर्वाह करते. त्यांच्याकडे तेथील पत्त्याचे आधारकार्ड, मतदार कार्ड, पालिका कर पावती, लाइट बिल असताना त्यांना पर्यायी जागा न देता अतिक्रमणाचे कारण देत काढले. लक्ष्मी विष्णू मिल येथील पालिकेची अर्धा एकर जागा अतिक्रमण करून बळकवण्याचा प्रयत्न होत असताना त्यांना नोटीस देऊन काढू, असे आयुक्त सांगतात.

पण अद्याप कार्यवाही नाही. तर दुसरीकडे मजुरी करून जगणाऱ्या कुटुंबाचे पत्र्याचे घर बळजबरीने काढले जाते. चौगुले कुटुंब दोन लहान मुलांसह मागील आठ दिवसांपासून फुटपाथवर जगत आहे. स्वयंपाकही तेथे करतात. पालिकेने दखल घेतली नाही म्हणून बुधवारी गंगूबाई, उमाबाई, अर्चना, आरती, परशुराम, निकिता, श्रावण चौगुले यांनी पालिका गेटसमोर चूल मांडून स्वयंपाक करत निषेध नोंदवला. पर्यायी जागा देण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...