आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडी घरकुलमध्ये तीन खोल्यांची इमारत‎:पालिकेच्या बंद शाळेची जागा‎ 10 वर्षांसाठी खासगी शाळेला‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विडी घरकुलमधील बंद पडलेल्या शाळेची‎ जागा दहा वर्षांसाठी खासगी शाळेला भाड्याने देण्यात‎ आली आहे. महापालिका तेलुगु शाळा क्रमांक २ ही विजय‎ शिक्षण प्रसारक मंडळ श्री मार्कंडेय विद्यालय यांना शैक्षणिक‎ कामासाठी देण्यात आली आहे. याबाबत १४ डिसेंबर रोजी‎ महापालिका उपसमितीत निर्णय झाला आहे. पालिकेने‎ ७१४० रुपये अपेक्षित भाडे धरले होते, आता ७२०० रुपये‎ प्रतीमहा भाड्याने दिले आहे. तीन खोल्यांची इमारत आणि‎ समोर मोकळी जागा अशी ७ ते १० हजार चौरस फुटाची‎ जागा आहे. सध्या शाळा बंद आहे. फरशा निघालेल्या‎ आहेत. तेथे प्रभाग क्रमांक १० साठी आरोग्य निरीक्षक‎ कार्यालय आहे. तेथूनच स्वच्छतेचे कामकाज केले जाते.‎

बातम्या आणखी आहेत...