आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळे महिलांना पिढ्यांपिढ्या बंद असलेली शिक्षणाची दारे खुली झाली. त्यानंतर सर्वच क्षेत्रातील शिक्षण घेत महिलांकडून यशाची गगनभरारी सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांतून आतापर्यंत एकूण ७६८ संशोधकांनी शोधकार्य पूर्ण करत पीएच.डी. मिळवली. या १९ वर्षांच्या काळात तब्बल २१७ महिलांनी संशोधन पूर्ण करत पीएच.डी. घेतली, ही माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. सोलापूर विद्यापीठाची स्थापना २००४ साली झाली आहे.
एका जिल्ह्यासाठी असलेल्या विद्यापीठात सुरुवातीच्या काळात फक्त ६० महाविद्यालये कार्यरत होती. ती संख्या आता दुप्पट झाली आहे. तसेच उच्च शिक्षण घेण्यामध्ये मुलींचे प्रमाण ही वाढत आहे. विद्यापीठाकडून आजपर्यंत देण्यात आलेल्या पीएच.डी. पदवीमध्ये ३२ टक्के मुलींचा समावेश आहे. उर्वरित संख्या ही मुलांची आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संशोधन क्षेत्रातील महिलांशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला असता, मुलींनी शिक्षणाची कास सोडू नये, असा संदेश दिला.
भूमिहीन शेतमजुरांवर शोध, समस्यांवर उपाय ग्रामीण विकास या विषयातून संशोधन करत आहे. संशोधनात भूमिहीन शेतमजुर (स्त्रीपुरुष) सामाजिक आर्थिक स्थितीचा अभ्यास करणार आहे. विशेषता भूमिहीन शेतमजूर महिलांना जगण्यासाठी कसरत करावी लागते. त्यावर अभ्यास करून सामाजिक व आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठी त्यावरील उपाय योजना सुचवण्यात येतील. महागाईमुळे घर खर्च, मुलांचे शिक्षण सांभाळताना त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. जास्तीत जास्त वेळ शेतमजुरी करून पैसे मिळवत असतात. यावर संशोधन हाेईल.’’ स्नेहल नष्टे, विद्यार्थी संशोधक
मैत्रिणींनो, काहीही झाले तरी शिक्षणाची कास सोडू नका कल्चरल स्टडीजवर पीएच.डी. करत असताना, कॅनडीयन आणि श्रीलंकन कल्चर अभ्यासता आले. डायस्पोरा, मायग्रेशन, आयडेंटिटी क्रायसिस, कल्चरल कॉनफ्लिक्ट यासारख्या बऱ्याच संकल्पना आल्या. त्यातून एक महिला म्हणून जीवन जगत असताना, अभ्यास व जीवन यात कुठेतरीच परस्पर संबंध जाणवत होता. महिलांच्या बाबतीतही असेच होते. महिला हक्काचे माहेर सोडून सासरी जातात, तेव्हा तिथे त्यांना स्वतःची ओळख निर्माण करावी लागते. हे शिवधनुष्य केवळ महिलाच पेलू शकतात. एक महिला म्हणून स्वतःच्या आयडेंटिटी सिद्ध करणे कठीण गोष्ट असते. परंतु अशक्य मात्र नाही! मैत्रिणींनो, कितीही संकट आली तरी शिक्षणाची कास सोडू नका. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे विसरू नका.’’ डॉ. माधुरी भोसले, शिक्षिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.