आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:निवासी डॉक्टर संपावर, पण अतिदक्षता विभागात सेवा सुरू

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना, मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामध्ये सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरही संपात सहभागी झाले आहेत. गरजू रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून अति दक्षता विभाग, कोविड वार्ड व प्रसूती विभागात व तत्काळ शस्त्रक्रिया सुुरू ठेवल्या आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास कटारे यांनी दिली.

मार्ड संघटनेचे सर्व पदाधिकारी सोमवारी सकाळी ओपीडीच्या वेळेत बी ब्लॉक समोरील पोर्चमध्ये आंदोलन सुरू केले. बाह्य रुग्ण विभागात जावून सेवा देण्याऐवजी प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करीत होते. सिव्हिलमधील २१० निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग नोंदवला आहे.

गरजू रुग्णांच्या आरोग्यासाठी ३० ते ४० टक्के डॉक्टर आयसीयू, कोविड वार्ड, लेबर वार्डात सेवा देत आहेत.निवासी डॉक्टरांच्या समस्या मांडून शासन व प्रशासनास माहिती करून प्रयत्न केला. ज्यामध्ये राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण मंत्री, सचिव,आयुक्त व संचालक यांच्यासोबत संघटनेच्या अनेकदा बैठक झाल्या. मात्र कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.

अतिआवश्यक सेवा सुरू : सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मात्र इमर्जन्सी सेवा देत आहेत. प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,आंतरवासिता डॉक्टरांना ओपीडी व वार्डामध्ये सेवा देण्यासाठी तैनात आहेत. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन खैराटकर, यांनी सांगितले.

ओपीडी विस्कळीत होणार : सिव्हिलमध्ये ऑनकॉल डॉक्टर २४ तास सेवा देतात. दुसऱ्या दिवसी त्याच ठिकाणी दुसरे डॉक्टर सेवा देतील. मात्र ओपीडी व वार्डातील सेवा विस्कळीत होणार आहे.

या आहेत मागण्या
राज्यातील सर्व शासकीय किंवा पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी.
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागांची पदनिर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी रखडत पडला आहे. यामुळे निवासी डॉक्टरांचे भविष्य ताटकळत आहे.
बंदपत्रीत सेवेचे थोतांड तरी कशाला? सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरावीत. यामुळे निवासी डॉक्टरांचे व पदवी पूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कधी थांबणार?
१६ आॅक्टोबर २०१८ प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तत्काळ आदा करण्यात यावा.

बातम्या आणखी आहेत...