आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:‘इको नेचर’च्या माध्यमातून 500 जलपात्रे, जलकुंभ वाटपाचा संकल्प

सोलापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पक्षी, प्राण्यांच्या पाण्याची सोय करू : मनोज देवकर

जसजसा उन्हाळा वाढत जाईल, तसतसे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवतेच. प्राणी-पक्ष्यांची उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठीची होत असलेली धडपडही जाणवते. यासाठीच पक्ष्यांची चोच ओली होईल इतके तरी पाणी संवेदनशील माणूस नक्कीच उपलब्ध करू शकतो. इको नेचर क्लबच्या माध्यमातून सोलापूर परिसरात विविध ठिकाणी जलपात्र - जलकंुभ ठेवण्याचा संकल्प मांडला असून, यातील १०० जलपात्रेही विविध जागी ठेवण्यात आली. इको नेचर क्लबच्या माध्यमातून ५०० ठिकाणी जलपात्रे ठेवण्याच्या संकल्प आहे. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या वेळी मंडल अध्यक्ष महेश देवकर, आनंद बिराजदार, मधुसूदन जंगम, श्री. गोरे , दीपक चोपडे, विशाल गायकवाड, दैदीप्य वडापूरकर, विजय पाटील, श्री. स्वामी, इको नेचरचे मुख्य मनोज देवकर यांची उपस्थिती होती.

चला पक्ष्यांची आणि प्राण्यांची पाणी पिण्याची सोय करूया. त्यांची तहान भागवूया. यासाठी जलपात्रे, जलकुंभ देऊनही या उपक्रमात सहभागी होता येईल. मनोज देवकर, इको नेचर क्लब

बातम्या आणखी आहेत...