आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:गुंठेवारीसह अंतिम लेआऊट प्रकरणे निकाली काढा ; आमदार देशमुख यांनी घेतली आयुक्त उगलेंची भेट

सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गुंठेवारी जागेचे बांधकाम परवाना महापालिकेने थांबवले आहेत, तसेच अंतिम लेआऊटची हजारपेक्षा जास्त प्रकरणे मोजणीअभावी प्रलंबित आहेत. गुंठेवारी आणि अंतिम लेआऊटचे प्रकरण तत्काळ निकाली काढावे, अशी मागणी करत पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना आमदार विजयकुमार देशमुख यांनी निवेदन दिले.

पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बुधवारी आ. विजयकुमार देशमुख यांनी भेट घेतली. हद्दवाढ भागातील गुंठेवारी मिळकतीची मोजणी झाली नसल्याने बांधकाम परवाना दिला जात नाही. त्यामुळे सर्वसामान्याचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास विलंब लागत आहे. मिळकतीची मोजणी करावी म्हणून सिटी सर्व्हे कार्यालयास पालिकेने फी दिली पण मोजणी होत नाही. गुंठेवारीची मोजणी ताबडतोब करावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली. अंतिम ले आऊटचे प्रकरण मोजणीसाठी प्रलंबित असून, ते निकाली काढावे. यामुळेपालिकेचे उत्पन्न वाढेल असे आमदार देशमुख म्हणाले. यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक अमर पुदाले, नागेश भोगडे, प्रभाकर जामगुंडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...