आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:निर्बंध उठले, तापमानाचा वाढला पारा तरीही तिन्ही जलतरण तलाव बंदच, मार्कंडेय, सावरकर, सुंदरमनगर तलाव बंद असल्याने तगमग

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल महिन्यात तापमान वाढत आहे. उन्हापासून दिलासा देणारे शहरातील तिन्हीही जलतरण तलाव दीर्घ काळापासून बंद आहते. त्यामुळे जलतरण खेळाडूंसह नागरिक व मुलांची गैरसोय होत आहे. कोरोनाचे निर्बंध उठवून तलाव सर्वांसाठी खुले करणे आवश्यक असताना ते अद्याप बंद अवस्थेत आहेत. महापालिका क्रीडा विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

पाच हजार नागरिकांची गैरसोय
उन्हाळ्यात दरवर्षी सुमारे चार ते पाच हजार नागरिक जलतरण तलावात पोहण्यासाठी येतात. परीक्षा काळ संपल्यावर जलतरण शिकावे म्हणून तलावात गर्दी होते. सकाळ व सायंकाळी सुमारे पाच ते सहा बॅचमध्ये तलाव खुला असतो. तो तलाव बंद असल्याने सर्व बॅच बंद आहेत. यामुळे शिकाऊ विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे. सुमारे पाच हजार जणांची गैरसोय होतीय.

तलाव सुरू करण्याची मागणी
सोलापुरात अंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडत असून, त्यांच्यासाठी तलाव सुरू होणे आवश्यक आहे. ते बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. महापालिकेने तत्काळ तलाव सुरू करावेत, अशी मागणी जलतरणपटूंनी केली.

हौशी जलतरणपटूंची होतेय गैरसोय

तत्काळ तलाव सुरू करा
मागील सहा महिन्यांपासून वीर सावरकर तलाव बंद आहे. मार्कंडेय तलाव बंद आहे. यामुळे खेळाडूंचा सराव बंद असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागासाठी दैनंदिन सराव करणे आवश्यक असते. तलाव बंद असल्याने सराव होत आहे. महापालिकेने तत्काळ तलाव सुरू करावे.'' श्रीकांत शेटे, जलतरण प्रशिक्षक

तलाव लवकरच सुरू होतील
मार्कंडेय जलतरण तलाव खेळाडूंसाठी सुरू होता. तेथील मोटार नादुरुस्त असल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे तो तलाव बंद आहे. सावरकर तलाव स्मार्ट सिटीच्या ताब्यात आहे. सुंदरमनगर तलाव पाणी नसल्याने बंद आहे. तेथे पाणी सोडण्यात येईल. लवकरच तलाव सुरू होतील.'' नजीर शेख, पालिका क्रीडा अधिकारी

सुंदरमनगर
हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी विजापूर रोडवरील सुंदरमनगरातील तलाव शासनाचा असून, तो महापालिका चालवत आहे. पाण्याअभावी तलाव बंदच आहे. तलावात पाणी नसल्याने उन्हामुळे फरशा निघत आहेत. अंतरराष्ट्रीय दर्जाचा अत्याधुनिक पद्धतीने जिल्हा क्रीडा विभागाने तयार केलेला तलाव महापालिका चालवत असून, तो बंद आहे.

वीर सावरकर
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला वीर सावरकर जलतरण तलाव नूतनीकरणासाठी सहा महिन्यांपासून बंद आहे. संथगतीने काम सुरू असून, या उन्हाळ्यात तो सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावठाण भागातील नागरिकांना जलतरण तलाव नाही.

मार्कंडेय
अशोक चौकातील श्री मार्कंडेय जलतरण तलाव पूर्व भागातील नागरिकांना सोयीचा असून, तेथील मोटार बंद असल्याने पाच दिवसांपासून बंद आहे. खेळाडूंसाठी खुला असलेला एकमेव तलाव बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हा अंतरराष्ट्रीय दर्जाचा तलाव आहे.
अशोक चौक येथील मार्कंडेय जलतरण तलावातील मोटार नादुरुस्त झाल्याने बंद आहे.

बातम्या आणखी आहेत...