आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतनीकरण:मिळकत कर आकारणीची नूतनीकरण प्रक्रिया पुन्हा सुरू ; मिळकतदारांस हरकत घेता येणार नाही

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिका कर आकारणीच्या नूतनीकरणाच्या नावाने नागरिकांना चुकीच्या नोटीस पालिकेच्या वतीने देण्यात आल्या. त्या नोटिसा महापालिकेने माघारी घेतल्या असल्या तरी पुन्हा वाढीव बांधकामाची माहिती मिळकतदारांकडून मागवण्यास महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत जाहीर प्रसिध्दीकरण करण्यात येणार आहे. त्यांची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. मिळकतदारांनी माहिती नाही दिल्यास पालिका अधिकारी ज्ञात माहितीच्या आधारे कर आकारणी करणार आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका कर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांनी दिली. सन २००५ पूर्वी महापालिकेने कराचे नूतनीकरण केले. त्यानंतर वाढीव बांधकामे गृहीत धरून पालिकेने नागरिकांना प्रसिद्धीकरण करण्यात येईल वाढीव बांधकाम किंवा इमारतीत बदल केल्यास त्यानुसार कर आकारणी करणे आवश्यक आहे. मिळकतदारांनी त्वरित पालिकेस कळवून कर आकारणी करून घ्यावी. अन्यथा पालिका ज्ञात माहितीच्या आधारे आकारणी करेल. त्यावेळी मिळकतदारांस हरकत घेता येणार नाही. श्रीराम पवार, पालिका सहाय्यक आयुक्त.

बातम्या आणखी आहेत...