आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूषित पाण्याचा पुरवठा:पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी रिपाइंचा आंदोलनाचा इशारा

माढाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुर्डुवाडीत गीताबाईचा मळा व लक्ष्मीनगर परिसरात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटलेली आहे. त्यामुळे परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ती पाइपलाइन त्वरित बदलावी. अन्यथा २६ जानेवारी रोजी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा रिपाइंने मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ)चे युवक आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड यांनी निवेदन दिले. कुर्डुवाडीत गीताबाईचा मळा व लक्ष्मीनगर परिसरात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून, येथील नागरिकांचे आरोग्य धोख्यात आले आहे. येथील पाणीपुरवठा स्वच्छ व सुरळीत करण्यात यावा. याबाबत नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे

बातम्या आणखी आहेत...