आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:ठोकळ प्रशालेच्या मुलांकडून रितेश देशमुखांचे स्वागत;  निर्मला ठोकळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांनी माजी आमदार निर्मला ठोकळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ठोकळ प्रशालेतील स्काऊटच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सवाद्य व फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून रितेश देशमुख यांचे स्वागत केले. एका कार्यक्रमासाठी सोलापुरात आले होते. नियोजित दौऱ्यात ठोकळ यांना भेटीचे नियोजन नव्हते मात्र आग्रहाखातर व विद्यार्थ्यांची भेटण्याची इच्छा असल्याने त्यांनी दीड तासाहून अधिक वेळ दिला. माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी अभिनेते रितेश देशमुख यांना मानाचा फेटा बांधून, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

ठोकळ परिवारातील सदस्य, शिक्षक, मुख्याध्यापक समवेत अभिनेते देशमुख यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली.स्व. विलासराव देशमुख यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी ॲड. विपीन ठोकळ, सचिन ठोकळ, भिकाजी गाजरे, शिल्पा ठोकळ, प्राचार्य डी. डी. गाजरे, शेख वाय. जी., जकवडर एस. एन, सुरवसे ए. पी., रमणशेट्टी एन. सी., पाटील पी. एल.,कदम पी. के, पाटील व्ही. जी. उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...