आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडा:माढ्याच्या वडशिंगेत जबरी दरोडा; लोखंडी पाईप, दांडक्याने तिघांना मारहाण, 2 लाख 8 हजार 500 चा ऐवज लुटला

माढा(सोलापुर) / संदीप शिंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माढा पोलिस स्टेशन च्या हद्दीतील वडशिंगे (ता. माढा) गावात स्टॅम्प व्हेंडर सुरेश कदम यांच्या घरावर जबरी दरोडा घातला गेला आहे. ६ नोव्हेंबर च्या (शनिवार) पहाटे एक वाजून वीस मिनिटाच्या सुमारास दरोडा पडला असून ६ दरोडेखोरांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत सुरेश कदम यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली,मुलगा रितेश जखमी झालेत. या घटनेत रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख आठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आहे.

सुरेश कदम यांनी पत्नी वैशाली यांना दिवाळी निमित्त गंठण आणले होते.ते देखील चोरट्यांनी लांबवले.वैशाली यांच्या बोटातील अंगठ्या देण्यास मज्जाव करताच त्यांची बोटे कापा दरोडेखोर म्हणताच वैशाली यांनी बोट नका कापु म्हणत दोन अंगठ्या दरोडेखोरांना काढुन दिल्या.

मारहाणीत सुरेश कदम वैशाली कदम यांना गंभीर दुखापत झाली आहे.तर मोठा मुलगा रितेशला देखील लाकडाने मारहाण केलीय.तर छोटा मुलगा हर्ष ला लाकडाने मारहाण करताच तो मोठ मोठ्याने रडु लागल्याने त्याला मारणे बंद केले.माढ्यातील पाटील हॉस्पिटल मध्ये तिघांवर उपचार सुरु आहेत.

वडशिंगे गावातील संदीप पाटील यांना कदम यांच्या घरी दरोडा घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने ग्रामसुरक्षा यंत्रणेला फोन केला.आणी गावकरी सावध झाले.यामुळे गावात इतर ठिकाणी पडणाऱ्या दरोड्या च्या घटना टळल्या गेल्या.

या जबरी दरोड्याच्या घटनेमुळे वडशिंगेसह परिसरातील गावातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण संचारले आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.घटना समजताच पोलिसांनी ग्रामसुरक्षा दलांना सतर्क करत नाकाबंदी केली.मात्र दरोडे खोर हाती लागले नाहीत.शाम बुवा यांनी रात्रीच वडशिंगे गावात दरोडा पडलेल्या घरास भेट देऊन पाहणी केली.ठसे तज्ञ,श्वान पथक देखील घटना स्थळी पोहचले आहे.

माढा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा अधीक तपास करीत आहेत.संदीप पाटील यांनी सतकर्ता दाखवत ग्रामसुरक्षा दलास फोन केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधिक्षक व माढा पोलिसांनी पाटील यांचे अभिनंदन केलंय. लवकरच दरोडो खोरांच्या मुसक्या आवळल्या जातील नागरीकांनी सावधानता बाळगत ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करावा असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा यांनी केले आहे.

सुरेश कदम यांनी फिर्याद दिल्यानुसार ६ अनोळखी दरोडाखोरा विरोधात ३९७ कलमान्वये नोंद करण्यात आला आहे.कदम यांच्या घरावर दरोडा टाकुन जात असताना गावातील निमगाव रोडलगत असलेल्या बळीराम कदम यांच्या घराकडे दरोडेखोरांनी मोर्चा वळवला. मात्र ग्रामसुरक्षा दल सतर्क झाले होते. कदम यांच्या घरातील लोक ग्रामसुरक्षा दलाच्या फोनमुळे जागे झाल्याने गावातुन दरोडेखोरांनी गावातून पळ काढला.

शेजारच्या घरांना बाहेरुन कड्या हातात लोखंडी पाईप घेऊन दरवाजा तोडुन घरात शिरले.
सुरेश कदम यांच्या घरात दरोडा टाकण्या अगोदर दरोडेखोरांनी कदम यांच्या शेजारील घरांना बाहेरुन कड्या घातल्या.दरोडेखोरांनी कदम यांच्या घराचा हाॅलचा दरवाजा ढकलून,कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.घरात प्रवेश करताच लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करून कपाटातून दरोडेखोरांनी ऐवज घेत पोबारा केला.

असा नेला ऐवज-
रोख नव्वद हजार रुपये रक्कम,कदम यांनी पत्नीला दिवाळी निमित्त आणलेले ८० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण,१६ हजार रुपयांच्या दोन अंगठ्या,वीस हजार रुपयांचे फुले - झुबे,दोन हजार रुपयांचे पैंजण, पाचशे रुपयांचे जोडवे असा एकुण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेला.

२५ ते ३० वयोगटातील चोरटे मराठी भाषेचा वापर
दरोडेखोर हे २५ ते ३० वयोगटातील सडपातळ होते.ते मराठीत भाषेत बोलत होते.चोरी करण्या पुर्वी त्यांनी जबर मारहाण केली.यामुळे आम्ही सगळेच भिऊन गेलो.आणि कपाटाच्या चाव्या दिल्या. हातात लोखंडी पाईप,लाकडी दाडंके, बॅटरी,चाकु होते अशी प्रतिक्रिया जखमी सुरेश कदम यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...