आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेवर दरोडा:बंगळुरू-अहमदाबाद रेल्वेवर दरोडा, प्रवाशांचे सुमारे पन्नास तोळे सोने लुटले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरोटी, ता. अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बंगळुरू-अहमदाबाद रेल्वेवर दरोडा पडला. यामध्ये दरोडेखोरांनी प्रवाशांचे सुमारे पन्नास तोळे सोने लुटले. एस १ ते एस १२ डब्यापर्यंत हा प्रकार घडला. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी प्रवाशांचे पर्स, मोबाईल, हिसकावून घेतले तसेच अनेक प्रवाशांना चाकूचा धाक दाखवला तसेच मारहाणही केली. दरोडेखोरांनी रेल्वेवर दगडफेकही केली. रेल्वेमध्ये फक्त दोन टीसी होते आणि तेसुद्धा नशेमध्ये असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

सोमवारी पहाटे ३:३० च्या सुमारास सोलापूर जवळील बोरोटी स्थानकाच्या अलीकडे मोठ्या प्रमाणावर दगडफेक करत दरोडा टाकण्यात आला. रेल्वेच्या स्लीपर कोच मध्ये डब्यातच दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी अचानक सुरे काढून मारहाण सुरु केली. त्यात प्रत्येक महिलेच्या या घटनेत चोरट्यांनी महिला प्रवाशांना मारहाण करून ५० ते ६० तोळे सोने अन मोबाईल रोख रक्कम असा ऐवज लुटल्याची प्राथमिक माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली.

दरम्यान, ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बोरोटी हद्दीत एस ८- एस-९ १०, ११ २२ घडली. याबाबत संबंधित महिला प्रवाशांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची प्राथमिक माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली. मात्र महिलांना टार्गेट करत गळ्यांना सुरे जाऊन तर विरोध करणाऱ्या पुरुष मंडळींना दगडाने मारत हल्ला केला. पर्स बांगड्या, गळ्यातील मंगळसूत्र सोनसाखळ्या अशा अनेक साहित्य ओरबाडून नेण्यात दरोडेखोर यशस्वी झाले. यात डब्यात काही लोक आधीच प्रवासी म्हणून शिरलेले होते त्यांनी अंधार आणि पहाटेची वेळ पाहून बोरोटी येथे ही घटना घडवून आणली. एकीकडे खालून काही दरोडेखोर तर वरून आतून काही दरोडेखोर प्रवाशांना त्रास देण्याचे काम करत होते. जवळपास अर्धा तास हा प्रकार घडला मात्र सिग्नल तोडून हे कृत्य केले. त्यामुळे रेल्वे चालकानी सिग्नल आल्या कारणाने गाडी थांबवून ठेवली. या घटने दरम्यान एकही रेलवव किंवा लोहमार्ग पोलीस उपलब्ध नव्हते हा या घटनेतील धक्कादायक प्रकार आहे.

बातम्या आणखी आहेत...