आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:रोहिणी तुम्मा यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे साेलापुरातील वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच रोहिणी विजय तुम्मा यांना राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हैदराबाद येथील हॉटेल मनोहरमध्ये झालेल्या साेहळ्यात सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र, मानकरी बॅच या स्वरूपात पुरस्कार दिला गेला.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक, क्रीडा व वैद्यकीय पातळीवर आपल्या आपल्या क्षेत्रात कर्तृत्ववान असणाऱ्या राज्यातील विविध गुणवंत व्यक्तींचा दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. रोहिणी विजय तुम्मा यांची त्यांच्या क्रीडा व सामाजिक कार्याची दखल घेऊन “राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभा सन्मान पुरस्कारासाठी” निवड केली. रोहिणीने शालेय जिल्हा व राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धातून प्रावीण्य मिळवत यश संपादन केले होते.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण परीक्षेमध्ये तिने वरिष्ठ राष्ट्रीय पंचाची बहुमान देखील मिळवला आहे. तसेच विविध स्पर्धांमधून रोहिणी पंचाची महत्त्वाची भूमिका देखील बजावत असून, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्यदेखील करत आहे. रोहिणीने मिळवलेल्या यशाची दखल घेत सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, सचिव सुमुख गायकवाड, रवींद्र जयवंत, अतुल कुलकर्णी, नितीन काटकर, गोपाळ राठोड, संतोष पाटील, दीपाली पुजारी, उदय वगरे, प्रशांत पिसे, जयश्री कोंडा यांनीही गाैरव केला.

बातम्या आणखी आहेत...