आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:पंचनामेच झाले नाही तर शेतकऱ्यांना अनुदान कोणत्या निकषावर देणार?, रोहित पाटील यांचा शिंदे सरकारला सवाल

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पचनामे करावेत. पंचनामेच होणार नसतील तर सरकार कुठल्या निकषावरती शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार, असा सवाल माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी शिंदे सरकारला केला आहे.

दरम्यान रोहित पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील अवकाळीमुळे नुकसान झालेल्या ठिकाणी आज कुठेही पंचनामे सुरू नाही, अशी माहिती शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे सांगितल्यानंतर रोहित पाटील यांनी हा आरोप केला आहे.

कोणत्या निकषावर अनुदान?

रोहित पाटील पुढे बोलताना म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे अनेक भागातील फळबागा झोपल्या आहेत. तर काही ठिकाणी बेदाणा भिजल्या आहेत. राज्य सरकारने तातडीने पंचनामे सुरू करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असे समजले की आज कुठेही पंचनामे सुरू नाहीत. पंचनामेच होणार नसतील तर सरकार कुठल्या निकषावरती अनुदान देणार आहे असा सवाल रोहित पाटलांनी उपस्थित केला. राज्यातील एकही मंत्री शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे आहोत, असं सांगताना दिसत नाही. द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा उत्पादकांच्या माध्यमातून आम्ही पंचनामे तातडीने करण्याची मागणी करत असल्याचे रोहित पाटील यांनी म्हंटले आहे.

रोहित पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातज झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा आहे.एखाद्या शेतकऱ्यांचा बांधाचा निर्णय हा मंत्रालयात बसून घेता आला असता. मात्र आता थेट बांधावर जाऊन निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. अयोध्येला जात जनतेचे प्रश्न सुटणार नाही. हा जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने जास्त काळ वेठीस धरणे अयोग्य असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले आहे. मविआ सरकारच्या काळात जसे शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेतले गेले तसे निर्णय या सरकारने घेणे गरजेचे आहे.