आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीच्या सत्यनारायण रामय्या बोद्धूल स्मृती उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्कारचे वितरण मोठ्या थाटात झाले. दि सोलापूर केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका प्रियवंदा गोडबोले यांच्या हस्ते हा सोहळा झाला. सुरेश सामलेटी, श्रीनिवास कमटम, राजू शेख, संगप्पा हावळकोड, डॉ. जयसुधा कोटा-पाटील, अन्नपूर्णा पाडमुखे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह, सोलापुरी टॉवेल, गौरवपत्र आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. क्लबच्या अध्यक्षा लता चन्ना, सचिव अंबादास गड्डम, प्रायोजक श्रीनिवास बोद्धूल, सहायक प्रांतपाल डॉ. सुरेश व्यवहारे, व्होकेशनल डायरेक्टर श्रीनिवास नंदाल आदी मंचावर होते. अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या दालनात हा कार्यक्रम झाला. या वेळी बोद्धूल परिवारातील सदस्य उपस्थित होते. परशुराम रापेल्ली, गणेश इराबत्ती, प्रा. विठ्ठल वंगा, चार्वाक बुर्गूल, श्रीनिवास बिंगी, श्रीनिवास रिकमल्ले, कालिदास माणेकरी, अशोक मांदवाद, प्रमोद अंबाल, सत्यनारायण गुर्रम यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.