आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोटरीच्या चार जिल्ह्यांचा" काश्मीर मेडीकल मिशन" प्रकल्पच्या माध्यमातून 43 सेवाव्रती डॉक्टरांनी 2499 रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. अशी माहिती प्रकल्प संचालक डॉ. राजीव प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्जन व स्वयंसेवकांनी घेतले मोफत शिबिर
11 मे ते 18 मे दरम्यान 43 सर्जन व स्वयंसेवकांनी मोफत शिबिर आयोजित करुन या शिबिरांमधून कर्करोग अस्थिरोग, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग ,नाक कान घसा, डोळे, दंत, प्लास्टीक सर्जरी मूत्रविकार अशा एकूण अकरा वेगवेगळ्या आजारांवरील अवघड शस्त्रक्रिया पार पाडल्या.
दुःखानं आणि आर्थिक पिडेने त्रासलेल्या सामान्य नागरिकांना या त्रासातून मुक्त करत आनंदाचा अनुभव दिला आहे. असेही प्रधान यांनी सांगितले. प्रीती कॅटर्स आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा संपूर्ण प्रकल्प किती संवेदनशील पद्धतीने हाताळला यासाठी काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि काश्मीर चे विभागीय आयुक्त पांडुरंग पोळे यांचे "मायक्रो प्लॅनिंग" किती उपयुक्त होते याची माहिती दिली.
सरकारी रुग्णालयात पार पडल्या शस्त्रक्रिया
11 ते 18 मे दरम्यान कुपवाडा, बारामुल्ला, सोपोर, गंदरबल अशा चार जिल्हा सरकारी रुग्णालयात या शस्त्रक्रिया पार पडल्या. अनेक स्वयंसेवक आणि 43 डॉक्टरांनी मिळून या आठ दिवसाच्या कालावधीत अविरत कष्ट करुन हा प्रकल्प पूर्ण केला. सकाळी 9 ते 5.30 पर्यंत हे शिबिर घेण्यात आले. यात अनेकदा सुरक्षा सेवाची सांगड घालत हे दिवस कामाने भरुन काढले. या संपूर्ण प्रकल्पात 150 वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मदत केली.
ज्यांचे निधी शिल्लक ते केले परत
संपूर्ण कार्य करण्यासाठी रोटरी जिल्हा 3131 (सोलापूर , सातारा, नगर मराठवाडा 3060, 3070 या विभागाचा हा रोटरी जिल्हा असून यासाठी जवळपास 50 कोटी रुपयांचा खर्च आला मात्र यात अनेकांनी सढळ हाताने मदत केली होती. प्रकल्पात जेवढा खर्च झाला तेवढा उरकून ज्यांचे निधी शिल्लक राहिले होते ते त्यांना परत करण्यात आले. शिवाय एकही रुपया न घेता सर्व डॉक्टरानी ही सेवा दिली. यात सोलापूरचे डॉ. संजय मंडाळे डॉ. सौरभ ढोपरे डॉ.शशिकांत गंजाळे, डॉ. उमा प्रधान आणि सोलापूरचे माजी प्रांतपाल डॉ. राजीव प्रधान यांनी प्रकल्प संचालक म्हणून काम केले. तर पनवेलचे डॉ. गिरीष गुणे यांनीही समन्वयक म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.