आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळाला लागणार मीटर!:घरगुती नळाला प्रती हजार लिटर पाण्यासाठी 11.50 रुपये, वाणिज्यसाठी 35, उद्योगासाठी 70 रुपये दर

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी घरोघरी पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु आहे. घरगुती नळाला प्रती हजार लिटर पाण्यास 11.50 रुपये, वाणिज्यसाठी 35 तर उद्योगासाठी 70 रुपये दर असणार आहे.

प्रत्येक तीन महिन्यानी नागरिकांना बिले देण्यात येणार आहे. मीटरसाठी नागरिकांनी यापूर्वी पैसे भरले असेल तर ती रक्कम वजा होईल. इलेक्ट्रीक वाहन व चार्जिक स्टेशन असणाऱ्यांना 2 ते 5 टक्केपर्यंत करात सूट देण्यात येणार आहे. विना परवाना बांधकाम असल्यास त्यांना दुप्पट कर आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

पाण्याचे दोन प्रकारचे मीटर कसे

शहरात सुमारे 2.08 मिळकत असून, यापैकी 1.92 लाख मिळकतीचे वाॅटर ऑडीट करण्यात आले. अन्य घराचे ऑडीट सुरु आहे. प्रत्येक घरास इलेक्ट्रीक व मेकॅनिक मीटर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी दर निश्चीत करणे सुरु आहे. फरकांची रक्कम तीन टप्यात नागरिकांकडून वसुल करण्यरात येईल. दर तीन महिन्यांनी मीटरचे बिल मोबाईलवर देण्यात येणार आहे. यासाठी मक्तेदार नियुक्ती करण्यात येईल.

असे असतील दर, प्रती हजार लिटरसाठी (सन 2012 साली महापालिका सभागृहात ठरले होते)

  • घरगुती - 11.50 रुपये, तीन महिन्यात 30 हजारपेक्षा जास्त वापरले तर प्रती हजार 15 रुपये
  • वाणिज्य - 35 रुपये
  • उद्योग - 70 रुपये

महापालिका इलेक्ट्रीक वाहन धोरण सुरु करणार

शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहन धोरण शासनाने जारी केले. त्यानुसार पालिका करात सुट देण्यात येणार आहे. घरात इलेक्ट्रीक वाहन व चार्जिग सुविधा असेल तर दोन टक्के सूट देण्यात येईल. सोसायटीत 20 टक्के घरात इलेक्ट्रीक वाहन व चार्जिग सुविधा असेल तर 1 टक्के तर 40 टक्के घरात वाहने असतील तर 2 टक्के, 60 टक्के असतील तर 3 टक्के, 80 टक्के असतील तर 4 टक्के आणि 100 घरात असतील तर 5 टक्के सूट देण्यात येणार आहे.

नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करावे. त्यानंतर महापालिका खात्री करेल आणि बिलात सुट देईल. ग्रीन बिलासाठी 2 हजार 527 जणांनी अर्ज केले असल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...