आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक वर्ष:ऑगस्ट उजाडला तरी आरटीई प्रवेश सुरूच, 575 जागा रिक्त

​​​​​​​सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादीतील चौथ्या टप्प्यातील प्रवेश झीरो करण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी प्राथमिक शिक्षण विभागास दिलेल्या आहेत.

आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यात एकूण ३०६ शाळा असून त्यामध्ये मनपाच्या १८ शाळांचा समावेश आहे. एकूण २२२३ एवढी प्रवेश क्षमता होती. प्रवेशासाठी एकूण ५३२३ प्रवेश अर्ज दाखल झाले होते. पहिली निवड यादी जाहीर झाल्यानंतर चार प्रतीक्षा याद्या लावण्यात आल्या. त्यामध्ये १६४८ जणांचा प्रवेश निश्चित झालेला आहे. तरीही जिल्ह्यात ५७५ जागा रिक्त राहिलेल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत सर्व जागा भरत नाहीत तोपर्यंत वेटिंग लिस्टमधील मुलांना प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...