आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीची क्षमता 250 वॅट असलेल्या ई-बाईकमध्ये परस्पर बदल करणाऱ्यांवर परिवहन उपप्रादेशिक विभागाकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या नव्या कडक नियमानुसार सोलापूरात अनेक ठिकाणी 11 अशा बदल केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
राज्यभरात आतापर्यंत 1 हजार 253 वाहनांची तपासणी करण्यात आहे. यात 347 ई-बाईक दोषी आढळल्या असून, त्यातील 233 दुचाकी जप्त करण्यात आल्या. परिवहन विभागाने अनधिकृतरीत्या बदल करणाऱ्या ई- वाहनांवर कारवाईचे आदेश 19 मे रोजी दिले. 31 मेपर्यंत राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांनी ही कारवाई केली आहे. यात राज्यातील 139 ई-बाईकच्या शोरूमची झाडाझडती घेण्यात आली आहे.
त्यानुसार सोलापूरतीलही एका शोरूमची तपासणी करण्यात आली आहे. 11 वाहनांची तपासणी करून गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. विजापूर रोड होटगी रोड आणि बाळे अश्या ठिकाणी गेल्या दोन दिवसात ही तपासणी करण्यात आली यावेळी 11गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
असे केले जातात बदल
कोणतीही इलेक्ट्रिक बाईक घेताना तिचा वेग साधारणपणे 25 किमी असतो. याच्या बॅटरी 250 vat च्या असतात. मात्र काही लोक मोहापायी याची बॅटरी अधिक क्षमतेची करून त्याला अधिक वेगाने पळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यात 50 किमी धावणाऱ्या गाड्या आढळले आहेत. यात आक्षेप असा आहे की, या गाड्या जर 25 किमीने धावणाऱ्या असतील तर त्याला उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी किंवा नोंदणी गरजेची नाही.
त्यावेळी या गाड्यांचा रोड टॅक्स आणि नोंदणी खर्च असा साधारण 12 हजार पर्यंतचा खर्च माफ होतो. मात्र जर त्या गाडीचा वेग वाढवला तर मात्र या सगळ्या नियमांची रक्कम भरून गाडी रीतसर नोंदणी करून घ्यावी लागते आणि त्याचसाठी या कारवाई केलेल्या वाहनचालकाच्या गाड्या जप्त केल्या आहेत.
परस्पर बदल करू नका
ई-बाईकमध्ये परस्पर अंतर्गत बदल करून वेग मर्यादा वाढवू नका अथवा जादा क्षमता असलेली बॅटरी बसवू नका. अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे मोटार वाहन निरीक्षक किरण खंदारे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.