आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापुरात जवळपास ४९२ रुग्णवाहिका आहेत. त्या दिवसभर रस्त्यावरून सायरन वाजवत जाताना दिसतात. या वाहनांना परवानगी कशी दिली?, त्याचे फिटनेस चेक होतो का?, चालक ट्रेनिंग असलेला आहे का? असे अनेक प्रश्न उभे राहतात. हे प्रश्न समोर येण्याचे कारण म्हणजे मंगळवारी दुपारी सोलापूर-मोहोळ येथून एका रुग्णाला घेउन आलेली रुग्णवाहिका पार्क चौकात अचानक बंद पडली. हा प्रकार तेथे असलेल्या काही तरुणांच्या लक्षात आला. रुग्ण गंभीर असल्याने त्यांनी तत्काळ निर्णय घेतला. त्या चार-पाच तरुणांनी रुग्णवाहिका ढकलत डफरीन चौकापर्यंत नेली. जवळच असलेल्या आधार हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाला दाखल केले.
शहरातील रुग्णालयांची संख्या - ३०० आरटीओ नोंदीत एकूण रुग्णवाहिका - ४९२ रुग्णवाहिकांना रुग्ण सुविधा असेल तरच आरटीओ परवाना मिळतो. नवीन रुग्णवाहिकांना आठ वर्षांपर्यत दोन वर्षांतून एकदा फिटनेस तपासणी करून घ्यावी लागते. आठ वर्षानंतर एक वर्षाला फिटनेस तपासणी आवश्यक आहे. २०२१ मध्ये पक्त १० रुग्णवाहिकांची फिटनेस तपासणी झाली. २०२२ मध्ये फक्त ३ रुग्णवाहिकांची तपासणी झाली. कोरोना महामारीमध्ये दोन वर्षे तपासणीसाठी मुदत वाढ दिली. ती आता संपल्यामुळे रुग्णवाहिका पासिंग व अद्ययावत करून घ्याव्यात,असे आवाहन करत आहोत. विजय तिराणकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साेलापूर. शहर व जिल्ह्यामध्ये रुग्णांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकांची त्वरित तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज सलगर,सामाजिक कार्यकर्ते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.