आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:‘पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतरमंत्रिपदाची आशा करणे योग्य नाही’ सचिन कल्याणशेट्टी यांचे प्रतिपादन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी सरपंचपदापासून काम केले. प्रथमच आमदार झालो. त्यामुळे मंत्रिपदाची आशा करणे याेग्य नाही. मला जे काही मिळाले ते खूप आहे. भाजप जिल्हाध्यक्ष पदावर मला पक्षाने संधी दिली त्यामुळे शतप्रतिशत भाजप हे ध्येय ठेवून काम करणार आहे. यासाठी माजी आमदार राजन पाटील, साखर कारखानदार अभिजित पाटील हे भाजपात येत असतील तर त्यांचे स्वागतच करू, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

भाजप जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर कल्याणशेट्टी श्रमिक पत्रकार संघात आले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारल की, आपण मंत्रिपदाच्या स्पर्धेत हाेता, त्यातून माघार घेतली का? त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले. मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्हास स्थान मिळेलच असा विश्वास व्यक्त करून त्यांनी सांगितले, माझी निवड पक्षाने केली. त्यामुळे आगामी जिप, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढविण्याच्या तयारीत आहे. पण शिंदे गटाला सोबत घेण्याबाबत पक्षाचा आदेश असेल त्यानुसार काम करावे लागेल.

..तर दाेन्ही देशमुख अन् दाेन्ही पाटलांचे स्वागतच मी प्रथमच आमदार झालो, त्यामुळे पहिल्याच वेळी मंत्रिपदाची आशा करणे चुकीचे आहे. पक्षाचा आदेश पाळणा-यापैकी मी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ती पार पाडणार आहे. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख हे ज्येष्ठ आहेत. त्यांना मंत्रिपद मिळाले तर आणि माजी आमदार राजन पाटील, पंढरपूरचे अभिजित पाटील यांच्यासारखे नेते पक्षात आले तर त्यांचे स्वागतच असेल असे कल्याणशेट्टी यांनी सांगितले. भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सातपुते आदी.

मी तर राजकारणात येणारच नव्हताे : भाजप सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सचिन कल्याणशेट्टी यांचा शिवस्मारक सभागृहामध्ये गुरुवारी दुपारी सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, मी तर राजकारणात येणारच नव्हताे पण आलाे. पूर्वी सत्ता नव्हती, काहीही नव्हते, कार्यकर्ते मिळत नव्हते अशा परिस्थितीत ज्यांनी पक्षासाठी त्याग केला, वेळ दिला, पक्ष मजबूत केला त्यांना तर काहीच मिळाले नाही. तो आदर्श आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे. या विचारानुसारच मी काम करत राहिलो. पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडत होतो. त्यामुळेच पक्षाने माझ्या कार्याची दखल घेतली.

बातम्या आणखी आहेत...