आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तीची पायवाट:संत श्री नामदेव महाराज यांचा रथ, सायकल वारी पंढरपुरात दाखल

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते घुमान (पंजाब) निघालेला संत नामदेव महाराजांचा रथ व सायकल यात्रेची रविवारी परतीच्या प्रवासात पंढरपुरात संत नामदेव पायरीजवळ उत्साहात सांगता झाली. ज्ञानेश्वर माऊली नामदास या वेळी उपस्थित होते.

भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ व नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ही २३०० किलोमीटरची रथ व सायकल यात्रा दि. ४ नोव्हेंबर ते दि. ४ डिसेंबर २०२२ या दरम्यान काढण्यात आली होती. कार्तिकी एकादशीला संत नामदेव महाराज यांची ७५२ वी जयंती, संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा व गुरुनानक जयंती याचे औचित्य साधून संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील जन्मस्थानावरून या यात्रेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते करण्यात आला होता.

या सायकल यात्रेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकल रायडिंग केलेल्या व ५० पेक्षा अधिक वयोमान असलेल्या सुमारे ११० सायकलपटूंनी सहभाग नोंदवला होता. राष्ट्रीय स्तरावर निघणारी ही पहिली आध्यात्मिक यात्रा होती. संत नामदेव महाराज ७०० वर्षापूर्वी ज्या मार्गाने पंजाब प्रांतात गेले, त्याच मार्गाने ही रथ व सायकल यात्रा काढण्यात आल्याचे या यात्रेचे संयोजक व भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी सांगितले.

सात राज्यांमधून केला तब्बल २३०० किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांचा प्रवास करीत ही यात्रा परत पंढरीत दाखल झाली आहे. एक महिन्याच्या प्रवासात सात राज्यांतून ही वारी निघाली.

बातम्या आणखी आहेत...