आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपाचा परिणाम:वैद्यकीय अध्यापकांच्या वेतनात 30 ते 40 हजारांची होणार वाढ; सातव्या आयोगानुसार भत्त्यात वाढ

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय अध्यापक संघटनेने पुकारलेल्या संपास यश मिळाले आहे. संघटनेने मागणी केलेल्या बहुतांश मागण्या शासन दरबारी मान्य झाल्या आहेत. त्यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते, जोखीम भत्ताही देऊ केले आहेत. त्यामुळे अध्यापकांच्या एकूण वेतनात प्रति महिना ३० ते ४० हजार रुपयांची वाढ होईल. ही वाढ १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे अध्यापक मात्र वंचित राहिले आहेत. त्यांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे.

शासन दरबारी झालेल्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण संघटनेने सुचवलेल्या विविध विषयांवर चर्चा करून मागण्या मान्य करण्यात आल्या. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बैठक घेण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण, तसेच आयुष संचालनालय यांच्या नियंत्रणात असलेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, दंत महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालये येथे कार्यरत असलेल्या अध्यापकांना सातव्या वेतनानुसार सुधारित वेतन श्रेणीमुळे वेतनाच्या २० टक्के प्रमाणे वाढ केली आहे. वैद्यकीय अभ्यास व पदव्युत्तर भत्त्यामध्ये वाढ केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अध्यापकांना वैद्यकीय अभ्यास भत्ता प्रतिवर्षी दहा हजार व पदव्युत्तर भत्ता तीस हजार सध्या मिळत आहे. तोच भत्ता अखिल भारतीय विज्ञान संस्थांमध्ये वैद्यकीय अभ्यास भत्ता प्रतिवर्षी २ लाख ७० हजार रुपये व पदव्युत्तर भत्ता प्रतिवर्षी १ लाख ५० हजार मिळतो. या दोघांची तुलना केली असता अखिल भारतीय विज्ञान संस्थेमध्ये जास्त भत्ता मिळत आहे. तर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णासेवा व संशोधन अशी तिहेरी भूमिका पार पाडतात, त्यामळे एआयआयएमएस प्रमाणे भत्ता दिला जाणार आहे.

कंत्राटी अध्यापकांना सेवेत कायम करावे
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे भत्ते वगैरे लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचे अाभार मानतो. परंतु तात्पुरत्या स्वरूपात काम करत असलेल्या अध्यापकांना सेवेत कायम करावे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. डॉ. औदुंबर मस्के,अध्यक्ष,वैद्यकीय शिक्षण संघटना

प्रति महिना १० हजार जोखीम भत्ता वाढवला
शासकीय रुग्णालयामध्ये काम करताना विविध संसर्गजन्य आजारांवर डॉक्टर उपचार करतात, त्या दरम्यान संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच उपचार करताना काही वेळा रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांवर हल्ले करतात, या सर्व गोष्टींचा विचार करून प्रति महिना १० हजार रुपये जोखीम भत्ता वाढवला आहे. अधिष्ठाता व सहसंचालक, संचालक यांच्या विशेष भत्त्यांमध्ये वाढ केली आहे.

बातम्या आणखी आहेत...