आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:अप्रमाणित खताची विक्री, "लोकमंगल'ला देणार नोटीस; केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाकडून आदेश

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अप्रमाणित रासायनिक मिश्र खतांची विक्री केल्याप्रकरणी येथील लोकमंगल बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा परवाना रद्द करून, पोलिस कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय खत मंत्रालयाने राज्य शासनाला दिले आहेत. केंद्रीय पथकाने केलेल्या तपासणीत खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती, कृषी विभागातर्फे देण्यात आली. अप्रमाणित मिश्र खतांची विक्री करणाऱ्या देशभरातील कंपन्यांवर केंद्रीय रसायने व खत मंत्रालयाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये राज्यभरातील सहा कंपन्यांचा समावेश आहे.

केंद्रीय खते मंत्रालयाने देशभरातील काही मिश्र खतांच्या उत्पादक कंपन्यांची ३० एप्रिल २०२२ रोजी अचानक तपासणी केली. त्यामध्ये सोलापुरातील लोकमंगल बायाेटेक कंपनीचा समावेश होता. या संदर्भात कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे म्हणाले, “बायोटेक प्लान्टमधून मिश्रखतांचे ३० एप्रिलला घेतलेले नमुने तपासणीमध्ये अप्रमाणित आढळले. त्यासंदर्भात कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे. त्या कंपनीने मिश्र खतांसाठी युरियाची खरेदी निश्चित करून दिलेल्या ठिकाणाहून घेतली की दुसरीकडून? त्या संदर्भात चौकशी करण्यात येणार आहे. अप्रमाणित खत नमुन्यांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण १.३९, स्फुरदचे प्रमाण ३.८२ एवढे कमी आढळले आहे.”

लोकलमंगल बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर यापूर्वी तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सन २०१९ मध्ये फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. पण, प्रशासनाने चालढकल करत कारवाई टाळली होती. दरम्यान, केंद्रीय खत मंत्रालयाने राज्याच्या कृषी विभागास दिलेल्या आदेशाबाबत ‘लोकमंगल’चे मनीष देशमुख यांना संपर्क केला असता, त्यासंदर्भात कळाले असून त्यासंदर्भात मला माहिती घ्यायची आहे, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.

बातम्या आणखी आहेत...