आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तरंजित इतिहास:वैरागच्या 8 हुतात्म्यांना अभिवादन ; महिला ही मोठया संख्येने सहभागी

वैराग25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या रोजगार हमीच्या कायद्याने गोरगरीबकष्टकऱ्यांना चार घास हक्काचे आणि कष्टाचे मिळाले.त्या कायद्याचे मुळ मात्र रक्तरंजित इतिहासाने न्हाऊन निघाले आहे. हा कायदा होण्यापूर्वी वैरागमध्ये आठ हुतात्मांना प्राणाची आहुती दिली होती. त्यानिमित्ताने वैराग मध्ये त्या आठ हुतात्म्यांना मंगळवारी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वैराग गोळी बारात महिलांही मोर्चा आघाडीत मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. येणाऱ्या तरुण पिढीला या गोळीबाराच्या घटनेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने सुमारे ५१ वर्ष या मूक मोर्चा ची आठवण आजही जिवंत ठेवली आहे. असे माजी जि. प. सदस्य संतोष निंबाळकर यांनी बोलताना सांगितले.

वैरागमध्ये हुतात्मा झालेल्या आठ जणांमुळे संपूर्ण देशाला रोजगारहमीचा कायदा मिळाला. त्या आठ हुतात्मांच्या स्मृती वैरागमधील हुतात्मा स्मारक येथे जागवण्यात आल्या. मूक मोर्चाने येवून प्रथम खंडोबा वेस येथून मुख्य गांधी चौकातून छत्रपती शिवाजी चौकातून मार्गी येऊन स्मारक येथे येऊन श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. संतोष निंबाळकर, माजी सभापती केशव घोगरे, जिवाजीराव पाटील, मनोज डुरे, संजय डुरे पाटील, सभापती लक्ष्मण संकपाळ, भाऊसाहेब काशीद, काकासाहेब गायकवाड, वैजिनाथ आदमाने, लक्ष्मण जगताप, सुखदेव जगताप, किशोर सोनवणे, नगरसेवक शाहूराजे निंबाळकर, मोहन घोडके, पंडित माने, आप्पासाहेब खेंदाड, सरंपच तात्यासाहेब करंडे आदी नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...