आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Salute To Forest Martyrs By Planting Five Thousand Saplings At Once; Participation Of Various Organizations Including Forest Department, Municipal Corporation| Marathi News

उपक्रम:एकाच वेळी पाच हजार रोपे लावून वन शहिदांना अभिवादन; वनविभाग, महापालिकेसह विविध संस्थांचा सहभाग

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन करताना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता निसर्ग संरक्षण करताना शिकारी, तस्करांकडून झालेल्या हल्ल्यात देशभरात प्राण गमावलेल्यांना वन शहीद दिनाच्या निमित्ताने रविवारी सिद्धेश्वर वनविहारमध्ये एकाचवेळी स्थानिक प्रजातींची पाच हजार रोपे लावून त्यांच्या संरक्षणाची शपथ घेऊन अभिवादन करण्यात आले.

सोलापूर वन विभाग, महापालिका, लायन्स क्लब आॅफ सोलापूर ट्विन सिटी, युगंधर फाउंडेशन यांच्यासह शहरातील विविध पर्यावरणस्नेही संस्थांतर्फे वृक्षदिंडी काढण्यात आली. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले. सिद्धेश्वर वनविहारमध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी आमदार नरसिंग मेंगजी, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी कदम, लायन्स, क्लब ट्विन सिटीचे अध्यक्ष सागर पुकाळे, युगंधर फाउंडेशनच्या प्रा. रश्मी माने आदी उपस्थित होते.

उपवन-संरक्षक धैर्यशील पाटील यांनी प्रास्ताविकात वन शहीद दिन निमित्ताने माहिती दिली. तसेच, वनविहारात जैवविविधता, मियावाकी जंगल आदींबाबत माहिती दिली. यावेळी पर्यावरणस्नेही अनिल जोशी, रविकिरण वायचळ, नागेश बुगडे, नंदिनी जाधव, औदप्पा पुजारी रेवणसिद्ध मिळकुंदे सिद्धेश्वर यादव आदी उपस्थित होते. युगंधरच्या प्रा. रश्मी माने यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके, लक्ष्मण आवारे, वनपाल श्रीशैल पाटील आदी उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे यांनी आभार मानले.

रोपांचे मोफत वाटप
माऊली लँडमार्क संकल्पतर्फे यंदाच्या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान शहरातील विविध सोसायटी, मंडळांमध्ये वृक्षारोपणासाठी आत्तापर्यंत स्थानिक प्रजातींची साडेचार हजार रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. त्या संस्थेने आजपर्यंत १० हजार रोपांचे वाटप केले आहे. पर्यावरण संवर्धन गती, माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांमध्ये ती रोपं लावण्यात आली होती. संचालिका अश्विनी झांबरे, माउली झांबरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...