आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्माल्य निवारण उपक्रम:संभाजी तलाव परिसर 300 जणांनी केला स्वच्छ, नागरिकांकडून कौतुक

सोलापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसापूर्वी गणेश विसर्जन झाले आहे. सोलापूरचे वैभव असलेल्या संभाजी तलाव परिसरात अस्वच्छता व निर्माल्य साहित्य पडलेले होते. ते साहित्य उचलण्याची मोहीम बीएमआयटीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक व प्राध्यापक,विद्यार्थी असे मिळून 300 जणांनी प्रत्यक्षात हाता खोऱ्या पाटी घेवून सर्व परिसर स्वच्छ केला आहे.

गणपती विसर्जनानंतर या भागातील परिसर स्वच्छ झाला पाहिजे, या उद्देशाने बीएमआयटीच्या राष्ट्रीय सेवा योजना व दिलीपराव माने विचार मंचचे पदाधिका­ऱ्यांनी रोगराईचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी राबवलेली स्वच्छता मोहिम हा स्तुत्य उपक्रम असल्याचे युवकांचे उच्चशिक्षित नेतृत्व डॉ. पृथ्वीराज माने यांनी सांगितले.

संभाजी महाराज तलाव येथील सोलापूर महानगरपालिकेने केलेल्या हौदात श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी या परिसरात झालेले निर्माल्य दूर करण्याची संकल्पना युवकांचे उच्चशिक्षित नेतृत्व डॉ. पृथ्वीराज माने यांनी मांडली. व या मोहिमेत ते स्वत: सहभागी झाले. तर या अभियानात सुमारे 300 श्रमदात्यांनी या परिसरातील निर्माल्य हातात झाडू, पाटी घेऊन निवारण केले. तर ओला व सुका कचरा विलगीकरण करुन कुंडीत भरून दिला.

कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

या स्वच्छता मोहिमेत युवा मंचचे अध्यक्ष सुनिल जाधव, उमेश भगत, विकास कदम, अनिल हिबारे, नितिन भोपळे, शावरु वाघमारे, सतिश मस्के, बीएमआयटीचे कॅम्पस डायरेक्टर राहूल माने, प्राचार्य एस.जी. कुलकर्णी, ज्युनिअर महाविद्यालयाचे प्राचार्या प्रतिभा माने, ब्रह्मदेवदादा माने, बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हेत्रे, निलेश बाबर, सुनिल माळवदकर पांडूरंग झालटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख श्रीमती उषा दोडमिसे, ब्रह्मदेदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी येथील राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागी विद्यार्थी, ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेचे कर्मचारी व जूळे सोलापूर भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...