आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद लोकसभेची जागा शिंदे गटाचीच:पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार; संदिपान भुमरे यांनी केले स्पष्ट

पंढरपूर l सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद लोकसभेची जागा शिंदे गटाचीच आहे. पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार, असे औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेने लढवली आहे, त्यामुळे यंदा बाळासाहेबांची शिवसेना उमेदवार देईल असे भुमरेंनी म्हटले आहे. रोहयो मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मंत्री संदिपान भुमरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चोना उधान आले आहे. भाजपकडून औरंगाबाद लोकसभेसाठी तयारी सुरू करण्यात आली असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केले होते. तर महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघात याआधी निवडणूक लढवली नाही, अशा 18 लोकसभा मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य कराड यांनी केले होते. यानंतर भुमरेंनी मांडलेली भुमिका यामुळे आता शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता दिसून येत आहे.

लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणे गरजेचे आहे. अधिवेशनापूर्वी तो होईल अशी आशा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे मंत्रिपदासाठी इच्छूक असणाऱ्या आमदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

2024 ची तयारी:भाजप पहिल्यांदाच औरंगाबाद लोकसभेच्या मैदानात उतरणार, शुक्रवारी पहिली मोर्चेबांधणी

2024 ची औरंगाबाद लोकसभा निवडणूक शिंदे गटाच्या मदतीने लढण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक आणि राज्यस्तरीय नेतृत्वाने घेतला. त्यासाठी केंद्रीय कामगार, रोजगारमंत्री भूपेंद्र यादव औरंगाबाद दौऱ्यावर आले, त्यांच्या उपस्थितीत विविध स्तरांतील बैठकांचे सत्र झाले, ते जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, जातीय आणि धार्मिक समीकरणांचा अहवाल घेऊन दिल्लीला पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डांकडे सादर करतील. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड संभाव्य उमेदवार असतील, असेही सांगितले जात आहे. वाचा सविस्तर

तयारी लोकसभेची:सेनेच्या 12 जागांवरही भाजपचा दावा; प्रचाराचा औरंगाबादेत फोडणार नारळ

गेल्या वेळी शिवसेनेकडे शिवसेनेच्या आणि गमावलेल्या सतरा जागा शिवसेनेच्या कोट्यातील 12, राष्ट्रवादीच्या 3, काँग्रेस आणि अपक्षाची एक अशा 17 जागांवर भाजप तयारी करीत आहे. गेल्या वेळी पालघरसाठी राजेंद्र गावित या भाजपच्या विद्यमान खासदाराला शिवसेनेतून निवडून आणले. हिंगाेलीसाठी नांदेडचे हेमंत पाटील यांना भाजपने लोकसभेसाठी पाठवल्याची चर्चा होती. औरंगाबादेतून शिवसेना पराभूत झाल्यानंतर भाजपने संघटनात्मक कामात गती आणली. औरंगाबाद जिल्ह्यात भाजपचे तीन आणि शिवसेनेचे सहा आमदार होते. शिवसेनेचे पाच शिंदेंसोबत आलेले आहेत. तरीही येथे भाजपने दावा केलेला आहे. इथे शिंदेसेनेकडे आज तरी लोकसभेच्या दृष्टीने उमेदवार दिसत नाही.

वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...