आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगली जिल्ह्यातील खानापुरात एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. विटा पोलिसांनी कसून तपास करुन या घटनेमागील खरा प्रकार उघडकीस आणला आहे.
एका महिलेने अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या 6 वर्षीय बालकाला विहिरीत फेकले. आधी चिमुकल्याचे अपहरण झाल्याचा बनाव केला, आणि नंतर प्रियकराच्या मदतीने मुलाला विहिरीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.
शौर्यचा काढला काटा
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रुपेश घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. त्यातून तिने नवऱ्सयापासून वेगळे होण्याचे ठरविले आणि घटस्फोटासाठी अर्ज केला. गेल्या काही दिवसांपासून ती आणि शौर्य वेगळे राहत होते. मात्र, आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी शौर्य तिला नकोसा झाल्याने तिने आणि तिच्या प्रियकराने शौर्यचा काटा काढायचे ठरवले.
..अन् घात झाला
6 मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या आई म्हणजे ज्योती लोंढेने दिली. तर इकडे रुपेशने शौर्यला दुचाकीवरुन नेऊन एका विहिरीत त्याला फेकून दिले. विटा पोलिस चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते. पोलियांनी केलेल्या तपासात शौर्यचा मृतदेह विहिरीत सापडला. यानंतर पोलिसांनी तपासचे चक्रे फिरवली. यात ज्योती आणि रुपेश यांच्या प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावर त्यांना ताब्यात घेऊन चौकशह केली असता त्यांनी खूनाची कबुली दिली. यानंतर विटा पोलिसांनी प्रियकर आणि मृत मुलाची आई यांना दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.