आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरता टोकाला:अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलास आईने फेकले विहिरीत, नंतर केला अपहरणाचा बनाव

सांगली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलास विहिरीत फेकून दिल्याची घटना सांगली जिल्ह्यातील खानापूरमध्ये उघडकीस आली आहे. या मुलाच्या अपहरणाचा बनाव आईने केला होता.

खानापूरच्या लेंगरे गावामधील ही घटना असून शौर्य लोंढे हे ६ वर्षाच्या मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर मुलाची आई आणि तिच्या प्रियकरास अटक करण्यात आली आहे.रुपेश नामदेव घडगे असे प्रियकराचे नाव असून ज्योती प्रकाश लोंढे असे आरोपी आईचे नाव आहे. पोटच्या मुलाला विहिरीत फेकल्याच्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

नक्की घडले काय?

रुपेश आणि ज्योती यांचे अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधात सहा वर्षाचा मुलगा अडथळा ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुलाला विहिरीत फेकून दिले. त्यानंतर मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव आईने केला. या घटनेनंतर सांगली पोलिसांनी मुलाच्या आईला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.