आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत शहरातील पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींना स्वरक्षणासाठी व मुलींच्या आत्मविश्वासात वाढ व्हावी म्हणून मोफत कराटे प्रशिक्षणाचा उपक्रम “ऑपरेशन दुर्गा’ हाती घेण्यात आला आहे. अश्याप्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणारी सांगोला ही राज्यातील पहिली नगरपरिषद असल्याची माहीती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
राज्यात नगरपरिषद हद्दीतील महिला व बालक यांच्या कल्याणच्या कार्यक्रमासाठी नागरपरिषदांनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या वार्षिक उत्पन्नाच्या बांधील खर्च वजा जाता उर्वरित रकमेच्या 5% रक्कम राखून ठेवणे गरजेचे असते. या 5% निधीतून दरवर्षी महिला व बालकांच्या विकासासाठी विविध योजना व कार्यक्रम राबविले जातात. यावर्षी पारंपारिक ठरावीक कार्यक्रमांना फाटा देत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या संकल्पनेतून शहरांतील 5 वी ते 9 वी च्या मुलींच्या स्वरक्षणासाठी मोफत कराटे प्रशिक्षणाचा “ऑपरेशन दुर्गा’ हा नाविन्यपूर्ण विधायक उपक्रम नगरपरिषदेने हाती घेतला आहे. सांगोला नगरपरिषदेमार्फत राबिवण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्व उपक्रमाला शहरातून उत्तम प्रदीसाद मिळाला. तब्बल 75 मुलींच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. प्रशिक्षणासाठी गौतम वाघमारे यांची प्रशिक्षक म्हणून निवड झालेली आहे. सदर प्रशिक्षण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिभवन येथे 1 महिन्याच्या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे.
राज्यातील एकमेक आदर्श उपक्रम : मुलींवर वाढत्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांना स्वरक्षणासाठी तयार करणे, कराटे मुळे शरीर फिट राहून उत्तम आरोग्य राखणे,मुलींचा आत्मविश्वास वाढून त्यांचा व्यक्तिमत्व विकास साध्य करणे करिता हे ऑपरेशन अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या “ऑपरेशन दुर्गा’ चे सर्व स्तरातून स्वागत होत अाहे. राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज संस्था व शासकीय कार्यालयांनी अनुकरण करावा असा हा विधायक उपक्रम आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.