आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणात चकवा बसला की, थेट पाच वर्ष घरी बसावे लागते:सांगोल्यातील कार्यक्रमात शहाजीबापूंची तुफान बॅटिंग

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"तुमचे आणि आमचे सेम असते, असे सांगताना तुम्हाला खेळात चकवा नाही बसला तर गोल होतो आणि आम्हाला चकवा नाही बसला तर आमच्या अंगावर गुलाल पडतो. मात्र तुम्हाला चकवा बसला, तरी पुढच्या संधीत तुम्हाला यश मिळू शकते. पण आम्हाला जर चकवा बसला तर थेट पाच वर्ष घरी बसावे लागते." अशी मिश्किल टिप्पणी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

सांगोल्यात रविवारी राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी राज्यभरातील जिल्ह्याजिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा देताना शहाजीबापूंनी सगळ्या जिल्ह्यांची नावे एका दमात घेतली, तसेच, इथे आता अवघा महाराष्ट्र जमल्याचे सांगितले. शहाजीबापूंच्या या वाक्यानंतर जमलेल्या तरुणाईने टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रमात एकच जल्लोष पाहायला मिळाला. तुमच्याकडे बघितल्यावर वाटते देवाने आपल्याला लवकरच म्हातारे केले, असे म्हणत शहाजीबापू पाटलांनी तरुणाईशी संवाद साधत फटकेबाजीला सुरुवात केली.

बापूंची फटकेबाजी

तुमचे आणि आमचे सेम असते, आमचा चकवा देण्याचा धंदा आहे. तुम्हाला खेळात चकवा नाही बसला तर गोल होतो आणि आम्हाला चकवा नाही बसला तर आमच्या अंगावर गुलाल पडतो. फरक एवढाच आहे. आमचा चकवा चुकला तर पाच वर्षे घरात बसावे लागते अशी मिश्किल टिप्पणी ही आमदार पाटील यांनी केली.

तेव्हापासून बापू चर्चेत

काय झाडी... काय डोंगार... काय हाटील या डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्र गाजवणारे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असतात. प्रत्येक कार्यक्रमात ते डायलॉगबाजी केल्याशिवाय राहत नाही. लहान्यापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्यांच्या डॉयलॉगने भूरळ पाडली आहे. गुवाहाटीतले डॉयलॉग तर आजही अनेकांच्या तोडांत येते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेल्यांतर शहाजीबापूंची एक क्लिक व्हायरल झाली होती. त्यात त्यांचा काय झाडी... काय डोंगार... काय हाटीत.. हा डायलॉग फेमस झाला होता.

बातम्या आणखी आहेत...