आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे कसब्यात झाले ते सांगली मिरजेत होणार:संजय राऊत; म्हणाले - दलित-मुस्लीम समाजाचा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जे कसब्यात झाले ते सांगली मिरजेत होणार असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर वंचित आघाडीमुळे दलित - मुस्लीम समाजाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले?
खासदार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निर्णय हा कागदावरचा आहे. खरी शिवसेना कुणाची हे समोर येऊ द्यायचे असेल तर निवडणुकांना समोरे जावे असेही राऊत यांनी म्हटले आहे. जे कसब्यात झाले ते 2024 मध्ये सांगली, मिरजमध्ये होणार आहे. 2024 मध्ये शिवसेना निवडणूक लढवेल असे सांगतानाच कोल्हापुरात मुस्लीम बांधवानी मोठ्या जोषात शिवसेनेसाठी घोषणाबाजी केल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसतोय.

संजय राऊत यापुढे बोलताना म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दलित समाज, मुस्लीम समाज आणि 18 पगड जातीच्या लोकांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे मान्य केले आहे. जनता ठरवेल की शिवसेना कुणाची आहे, त्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचेही राऊतांनी म्हटले आहे.

कसब्यात शिवसेनेची ताकद

संजय राऊत यापुढे बोलताना म्हणाले की, कसब्यात सातत्याने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येत होता. तर भाजपला वाटले की हा त्यांचा मतदारसंघ आहे. मात्र, कसब्यात 40 हजारांपेक्षा जास्त मते शिवसेनेची होती त्यांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवली आणि जिंकली जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. हे कालच्या निकालाने स्पष्ट झाले असेही त्यांनी म्हटले. सांगली शहरात आणि मिरजेत सुद्धा आगामी निवडणुकीत तेच होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. शिवसेना प्रेमी जनता एका चिडीमधून पुढे आली आहेत. सर्व जातीचे लोक सांगताय की बाळासाहेबांची शिवसेना दुसऱ्याची कशी होऊ शकते. केवळ निवडणूक आयोगाने कागदोपत्री शिवसेना त्यांना दिली आहे. मिरज आम्ही भाजपसाठी सोडायला नको होता, असे म्हणत आता आम्ही पुन्हा मिरजेत निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...