आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी:संत तुकाराम महाराज पालखीचे 20 जूनला पंढरपूरकडे होणार प्रस्थान

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकादशीच्या निमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या २० जून रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाच्या वर्षी तिथी-वाढ असल्याने इंदापूर येथे एक मुक्काम वाढेल. तसेच आंथुर्णे येथेही यंदा पालखी मुक्कामी असेल अशी माहिती पालखी सोहळा समितीतर्फे देण्यात आली. मागील कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर सर्व संतांचे पालखी सोहळे आषाढी वारीनिमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३७ वे वर्ष आहे. संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे व विशाल महाराज मोरे यांची पालखी सोहळ्याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. १० जुलैला आषाढी एकादशीचा महासोहळा आहे. त्यानिमित्ताने २० जून (ज्येष्ठ वद्य सप्तमी) पालखी सोहळा देहूच्या इनामदार वाडा येथून प्रस्थान करेल. पालखी सोहळ्यात नोंदणीकृत ३२९ दिंड्या आहेत. मोकळ्या दिंड्यांची संख्या २०० पेक्षा अधिक आहेत, तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २१ जूनला आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे. यंदा मोठ्या उत्साहात आषाढी यात्रा पार पडण्याची शक्यता आहे.

पालखी मार्ग, पालखी तळावरील कामे पूर्ण करा
पंढरपूर - यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता असून, या सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर, पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. सोलापूरात पालखी सोहळ्याचे आगमन ४ व ५ जुलै रोजी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पालखी मार्ग व विविध पालखी तळांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...