आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोम्मई यांनी बोलावले होते चर्चेला:सीमावर्ती भागातील 11 गावांचे सरपंच चर्चेसाठी बेळगावला जाणार नाहीत!

विजय साळवे | सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील ११ गावांना कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयातून सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी १ डिसेंबर रोजी संपर्क साधून १९ डिसेंबरला बेळगावला बोलावले होते. तडवळ (ता. अक्कलकोट) सीमाभाग रस्ते-पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष महांतेश हत्तुरे काही सरपंचांसह बेळगावला जाणारही होते. मात्र समितीतील सदस्यांपैकी एकाच्या नातेवाइकाचे निधन झाल्याने सोमवारी बेळगावला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सीमावर्ती भागाकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष झाले. हे प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सीमावर्ती भागातील गावांनी करत ११ गावांनी ठरावही दिले होते.

बातम्या आणखी आहेत...