आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:वडाळा सोसायटीच्या चेअरमनपदी साठे, व्हाइस चेअरमन गायकवाड

उत्तर सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वडाळा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी बापूराव साठे तर व्हाइस चेअरमनपदी दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. वडाळा विकास सोसायटीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचे एकतर्फी वर्चस्व राहिलेल्या विकास सोसायटीचे संचालक म्हणून बळीराम साठे, जितेंद्र साठे, बाजीराव गाडे, नारायण गाडे, शिवाजी जमदाडे, बाळासाहेब सुतार, गणी शेख, अर्जुन नागणे, मिलिंद साठे, निर्मला बापू नागणे, नलिनी चंद्रकांत साठे आदी बिनविरोध झाले होते.

निवडीनंतर काका साठे, सरपंच जितेंद्र साठे यांनी नूतन चेअरमन बापूराव साठे व नूतन व्हाइस चेअरमन दत्तात्रय गायकवाड यांची सत्कार केला. या वेळी माजी सरपंच प्रभाकर गायकवाड, विकास गाडे, माजी प्राचार्य चंद्रकांत साठे, ग्रामपंचायत सदस्य संपत गाडे, विश्वास साठे, हरीभाऊ घाडगे, श्रीकांत साठे, स्वप्नील गाडे, प्राचार्य शंकर खळसोडे, प्रा. सतीश नागणे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...